आझादी का अमृत महोत्सव अंर्तगत ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ या उपक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची  Online 1075 ची नोंद करुन विक्रम. 

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
100 % जनतेच्या घरावर शेवडी (बा.) ग्रामपंचायत कार्यालयाकडुन मोफत देण्यात आलेला तिरंगा ध्वंज दि. 13 /08/2022 ते दि. 15/08/2022 या कालावधीत लावण्यात आला.
https://youtube.com/shorts/yJpvJcpRIW8?feature=share
गावातील विविध शाळेतील विदयार्थ्यांना महामानवांची वेषभूषा परिधान करुन त्यांची सजवलेल्या बैल गाडीतुन मोठया उत्साहात वाजत – गाजत संपूर्ण गावातुन मिरवणुक काढली. या मिरवणुकी सोबत लेझिम पथक, ढोल पथक, सह देखावे व गावातील सरपंच, उपसरपंच, मा. सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरीक , महिला, तरुण इ. सर्व जाती धर्माचे नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
या मिळवणुकिचे स्वागत गल्लोगल्ली महालांनी आपल्या दारात रांघोळी काढुन व पुष्पवृष्टी करुन केले. स्वातंत्र्याचा उत्सव अत्यंत जल्लोषात संपुर्ण गावने एकजुटीने एक ताकतीने हा उत्सव साजरा केला आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक कैलास धोंडे, गावचे तरुण सरपंच बसवेश्वर धोंडे, , ग्रामविकास अधिकारी नावंदे साहेब, उपसरपंण दत्तात्रय येजगे, ग्रा.पं. सदस्य संगमेश्वर चपटे, मन्मथ येजगे, रौफ लालामियाँ , पुंडलिक ईदुलवड, मारोती वत्ते, यांच्यासह गावातील तरुण व पुढाकार घेतलेली टिम अरुण राईकवाडे, अमोल पांडे, रोहिदास वत्ते, नागेश माचुद्रे, बंन्डु घुंगराळे, नागनाथ सोळंके, महादु आरळे, मारोती तेजबंद, महादु एरंडे, प्रकाश चिकाळे, ओकांर धोंडे, संतोष पंदीकोडलवाड, मन्मथ धोंडे, फय्याज शेख, केरबा महाराज ऐकलारे, लिंगेश्वर डोंगरे, कपिल तेजबंद इत्यादी तरुणांनी मोठया प्रमाणात मेहनत घेतली आहे व कार्यक्रम यशस्वी केला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या