अर्जापुर ते सगरोळी ३३ केव्ही विज जोडणीचे श्रेय लाटण्याचा प्रर्यत्न करु नये – सगरोळी परिवर्तन पॅनल !

मौजे सगरोळी येथील ३३kv स विज पुरवठा हे शंकरनगर येथुन आहे. पण सतत लाईट जात असल्यामुळे येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी तंत्कालीन आमदार सुभाष साबणे यांना सांगुन DPDC मधुन अर्जापुर ते सगरोळी नविन विज जोडणीस निधी मंजुर करुन घेतला व ते काम ही पुर्ण झाले.

पण काम पुर्ण होउन ही विज जोडणी होत नाही या मुळे सगरोळी परिवर्तन पॅनलच्या आठ ग्राम पंचायत सदस्यांच्या वतीने दि. १०-५-२०२१ रोजी अर्जापुर ते सगरोळी विज जोडणी करा अशी लेखी तक्रार दाखल केली व वांरंवार उप कार्यकारी अभियंता यांना भ्रमणधनीवर संपर्क केला तरी विज जोडणी होत नाही म्हणुन पुन्हा दि २६-८-२०२१ रोजी निवेदन देउन दि १३-९-२०२१ रोजी आंदोलन करण्याचा इशारा सगरोळी येथील समन विश्वनाथ, मुत्येपोड प्रभु, शंकर महाजन, शिवराज बामणे, संजय पद्दमवार, विठ्ठल सुरकुटलावार, शेख मुर्तुज, बालय्या गौतमवार यांनी दिला.

ह्या आंदोलनास सगरोळी परिसरातील सगरोळी पं.स सदस्य प्र. शुभम खिरप्पावार, येसगी सरपंच सद्दाम शेख, बोळेगाव सरपंच प्र. विश्वनाथ बोधनापोड, दौलतापुर येथील सरपंच संदिप भोसले, शिंपाळा सरपंच प्र.दत्ता मुगडे, हिप्परगा सरपंच प्र. विठ्ठल हिप्परगेकर, रामपुर सरपंच गणेश मुगडे, सगरोळी सरपंच प्र.पिराजी शेळके यानी पाठींबा दर्शवल्या नंतर दि १०-९-२०२१ रोजी उप कार्यकारी अभियंता यानी दि.३०-९-२०२१ पर्यंत विज जोडणी करण्याचे लेखी अश्वासन दिले. या मुळे सदरील आंदोलन स्थगीत करण्यात आले.
या नंतर काही तांत्रिक अडचणी मुळे लाईन जोडणी झाली नाही. तरी सगरोळी परिवर्तन पॅनलचे ग्राम पंचायत सदस्य, कार्यकर्ते सतत भेटुन भ्रमणध्नीवर पाठपुरवा करत असल्यामुळेच अर्जापुर ते सगरोळी ३३kv विज जोडणी होत आहे. पण काही जणांना ह्याच श्रेय सगरोळी परिवर्त पॅनलच्या कार्यकर्त्यास गेल्यास ते प्रंचक्रोशीत मोठे होतील ह्या भिती पोटी काही पेपर मधे बातम्या देउन विज जोडणीचे श्रेय लाटण्या प्रयत्न करत आहेत असा आरोप होत आहे.
अर्जापुर ते सगरोळी विजजोडणी ही फक्त सगरोळी परिवर्तन पॅनलच्या पाठपुराव्यामुळेच होत आहे. त्या मुळे दूसर्‍यानी ह्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये असे सगरोळी परिवर्तन पॅनलने जाहीर केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या