भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रा.जि.प.आदर्श शाळा खरसई मराठी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेत अमृत वर्षाचे औचित्य साधून १ आॅगस्ट पासून शाळेत पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये शाळेचा एकुण १०९ पट असून. तरी ईयत्ता नूसार गटानूसार, विषयानुसार विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा शाळा स्तरावर घेण्यात आल्या.
या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. यावेळी शाळेत रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मांदाडकर, उपाध्यक्ष जगदिश खोत, सदस्य जनार्दन खोत, गणेश मांदाडकर, हरिश्चंद्र कोळी, प्रभाकर कांबळे, रामचंद्र मांदारे, काशिनाथ माळी, जयाप्रभा माळी, तारा पाटील, भारती शितकर, संपदा मांदारे, भिमा वेटकोळी, अंगणवाडी सेविका अनिता शितकर, मालती शितकर, रंजना वेटकोळी, अनिता मेंदाडकर, नाझनीन फकीर, मदतनीस मनिषा खोत, सुचिता पयेर, दुर्गा खोत, हेमा पाटील, बबिता पेरवी, रूपाली शिताळे आशा सेविका निर्मला पयेर, हर्षला शितकर होते.
अतिशय चांगल्या वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने खरसई शाळेने पाऊल उचलले आहे.
यासाठी सर्वच बाबींतून सहकार्य मिळत आहे. शिक्षक – पालक मेळावे, प्रभात फेरी, महिला बचत गटांचे सहकार्य, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्ती कार्यक्रम, वृक्षलागवड करणे, शालेय, परिसर स्वच्छता, शाळेचे आजी माजी विद्यार्थी यांचे सहकार्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, यांचे योगदान लाभले.
शाळेचे कार्यतत्पर मुख्याध्यापक बालाजी राठोड, उपशिक्षक अशोक सानप, बालाजी मडावी, जयसिंग बेटकर, संदिप शेंबाळे शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. प्राथमिक शाळेत भारताचा अमृतमहोत्सवी वर्षे विविध उपक्रमांनी व जनजागृती करून साजरा होत आहे याचे कौतुक गावातील शिक्षण प्रेमी , विविध शैक्षणिक, सामाजिक मंडळे यांनी केले आहे. सर्वच स्तरातून चांगल्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
बातम्या साठी सपंर्क करा- 
रायगड – प्रा अंगद कांबळे
मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या