प्रभाग पाच मध्ये मोफत आधार कॅम्प ; नगरसेवक शेख मुखत्यार यांचा पुढाकार !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

येथील प्रभाग क्रमांक पाचचे नगरसेवक शेख मुखत्यार खाज्यामिया यांनी प्रभाग पाच मधील सर्व नागरिकांसाठी मोफत आधार कॅम्प आयोजित केला आहे,

या कॅम्प मध्ये नवीन आधार कार्ड काढणे, नाव दुरुस्ती व जन्म तारीख दुरुस्ती,आधार अपडेट अशी कामे केली जात आहेत.

हा कॅम्प दिनांक 6 ते 10 सबप्टेंबर दरम्यान आयोजित केला आहे. तसेच प्रभागातील नागरिकाना आधार कार्ड संबंधित काही समस्या असतील तर तात्काळ येऊन समस्या सोडवून घ्यावे असे आवाहन नगरसेवक शेख मुखत्यार यांनी केले आहे.

यावेळी माजी नगरसेवक शेख बाशीद,युवक काँग्रेस शहराध्यक्ष सिराज पट्टेदार, इब्राहिम खुरेशी, महंमदभाई बागवान,अहेमद सेठ बागवान, माधव मरकंटे, बाबांना मरकंटे, शेख अजीम खाजामिया, नबीसाब खुरेशी, मुन्ना खानसाब, युसूफ खाज्यामिया, जहीर इस्माईल, अहमदभाई चिकनवाले, वजीर शेख, फयाज बाबूमिया, रफिक अहमद, आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते..

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या