आई मी जिजाऊ होणार !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे)

आई मी जिजाऊ होणार !

-(प्रा.महंमद शेख यांचा लेख)

आई मी मुलगी म्हणून जन्मला आल्यानंतर घरातील सर्वांचे चेहरे काळवंडलेले,सर्वानी माझे दुःखी अंत:करणाने स्वागत केले,असे तूच मला सांगितले. माझ्या जन्माची बातमी समजल्यावर घरात जिलेबी वाटण्यात आली पण आई, मुलगी जन्मल्यानंतर जिलेबी किंवा बर्फी का वाटतात? आई म्हणाली अंग, जिलेबी किंवा या पदार्थाचा उल्लेख व्या करणातील ‘ती ‘या शब्दाने केला जातो. म्हणून मुलगी जन्माला आल्यानंतर जिलेबी किंवा बर्फी वाटण्याची परंपरा समाजाने रूढ केली आहें.पण आई, मुलगी झाल्यानंतर पेढे वाटले तर काय अनर्थ होईल. नुकसान होणार नाही ग! पण पुरुष प्रधान समाजाला कोण समजावून सांगणार? स्त्रीयांनी समाजाचे नीतिनियम पाळावयाचे असतात,तोडायचे नसतात.

पुरुषांनी समाजाचे नियम मोडले तर चालतात.आई जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राचा उद्धार करी असे म्हंटले जाते मग,ज्या पाळण्यात आहें त्या पाळण्याची दोरी तुझ्या हातात आहें व मी त्या पाळण्यात आहें म्हणजे राष्ट्राचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.

अंग,तुझ्या जन्मानंतर आपल्या घराच्या छताला ठेवला आहें. म्हणजे आई माझ्या जन्मानंतर आपल्या घरात मुलंच जन्माला आले नाही का गं?तू ज्या पाळण्यात होतीस तो पाळणा अशुभ मानून त्याला छताला टांगला आहें.

 

तुला पांढऱ्या पायाची म्हणून हिणवले जात असताताना मला काही दिवसानंतर ‘दिवस’ गेले पुन्हा घरातील वातावरण गंभीर बनले पण त्या काळात गर्भलिंग परीक्षण करण्यात आले. डॉ. सांगितले पोटात मुलाची वाढ होवू लागली आहें.

घरातील सर्वांना आनंद झाला. सर्वजन तूझे कौतुक करू लागले,पण आई, माझे कशासाठी कौतुक केले जाऊ लागले? आई म्हणाली अंग तुझ्या पायगुणामुळे घरात मुलगा जन्माला येणार अशी प्रत्येकीची भावना झाली आहें. आई मी तर पांढऱ्या पायाची आहें ना? अंग समाजाची हीच तर गंमत आहें. मला मुलगा झाला.

घरातील सर्वांना आनंद झाला.तू आज पासून त्याला ‘दादा ‘म्हणायचे.आई, तो माझ्या पेक्षा लहान आहें.आई म्हणाली तो लहान असलातरी तो दादा आहें. दादा च म्हणत जा समजलं बाईच्या जातींन जे सांगितले आहें तेवढंच ऐकाव आणि करावं हळू हळू दादा मोठा होवू लागला.त्याला शाळेत पाठविण्याची चर्चा होवू लागली मला नगर पालिकेच्या प्राथमिक शाळेत पाठविण्याचे आई वडिलांनी ठरवले मी म्हंटले,मला पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवा ना.आई लगेच डोळे वटारून म्हणाली तुला शिकवून आमचा काय फायदा होणार आहें? तुझा दादा आपल्या घरचा ‘आवक ‘आहें म्हणून आपण सर्वानी त्याला ‘आवक दादा’ असे म्हणायचे असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आई म्हणाली अगं दादाच्या रूपाने आपल्याला हुंडा,दागदागिने, सन्मान सगळे काही आवक करता येणार आहें तो आपल्या वंशाचा दिवा आहे.

 

दुसऱ्या दिवशी मी नागरपरिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वर्गात गेले वर्गात मुले मुली एकत्र होती. पण मुलाच्या पाठीमागे सर्व मुली बसल्या होत्या.मी बाईंना म्हंटले मला मुलांच्या पुढे बसायचे आहे. बाईने माझ्याकडे रागाने डोळे वटारून पहिले त्या वेळी माझ्या लक्षात आले कीं ‘स्त्री च’ स्त्रीची शत्रू आहे. बाईंनी वर्गातील फळ्यावर सुविचार लिहला होता ‘स्त्री पुरुष समानता हीच भारतीय संस्कृतीची महानता ‘हा सुविचार वाचल्यानंतर समाजाच्या वं बाईच्या वर्तनातील विसंगती मला जाणवली. वर्गाच्या भिंती बोलक्या होत्या, भिंतीवर राजमाता जिजाऊ, सावित्री फुले, इंदिरा गांधी कल्पना चावला, यांच्या प्रतिमा पाहून माझा उर भरून आला. माझ्या मनात क्षणभर विचार आला, आम्हा स्त्रियांना इतक्या महान कर्तबगार स्त्रीयांचा वारसा लाभला असतांना आज आम्हा स्त्रीचे जीव उपेक्षित का बनू लागले आहे?

आई, आमच्या शाळेत पंधरा आगस्ट ला ध्वजा रोहणासाठी आपल्या गावच्या सरपंच सौ.भारती काकू यांना बोलवण्यात आले. पण आपल्या गावातील सर्व पुरुषांनी पंधरा आगस्ट च्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. एका स्त्रीने फडकिवलेला राष्ट्रधवज ला आम्ही वंदन करणार नाही असे म्हणत सर्व पुरुष उठून गेले. आई आपल्या देशात पंतप्रधान इंदिरा गांधी लाल किल्ल्यावर 26जाने, 15आगस्ट रोजी सुमारे 16,17वर्ष या देशाचा तिरंगा फडकिवला. आपल्या गावातील पुरुषांनी भारती काकूंना विरोध करणे योग्य आहे का ? सर्व राजकीय पक्ष वं नेते स्त्रियांना केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी राजकारणात आणतात असे मला वाटते. माझे विचार ऐकून आई मला म्हणाली, अगं, अजुण पुरुष प्रधान समाजाची मानसिकता बदललेली नाही. आई माझ्या वर्गातील एका मुलीचे नाव ‘नकुसा ‘म्हणजे नको असतांना जी जन्माला येते ती नकुसा एक दिवस नकुसा शाळेत रडू लागली. तीला रडण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली,माझ्या आई वडिलांना वं डॉ. ना तुरुंगात टाकले आहे. नकुसाच्या आईने डॉ. मदतीने पोटात असणारा मुलीचा गर्भ पोटात मारून ‘स्त्री भ्रूण ‘हत्त्या ‘केली होती.
आई एके दिवशी एके दिवशी शाळा तापसण्यासाठी शिक्षणाधिकारी शाळेत आले .शिक्षणाधिकारी माझ्या वर्गात आले. आम्हाला त्यांनी विविध प्रश्न विचारले. मला म्हणाले तू कोण होणार ?मी पटकन उत्तर दिले.

मी जिजाऊ होणार. बाळ तू जिजाऊ का होणार ? असे शिक्षणधिकऱ्यानी मला विचारले. आई मी म्हंटले आपल्या देशाला महासत्ता घडविण्यासाठी घराघरात शिवबा निर्माण व्हावेत म्हणून आज जिजाऊंची आवश्यकता आहे. म्हणून. मी जिजाऊ होणार.माझे उत्तर ऐकून शिक्षणधिकारी माझ्या कडे आशर्यानी पाहातच वर्गाच्या भिंतीवर असलेल्या कर्तबगार पराक्रमी स्त्रीयांच्या प्रतिमांमध्ये माझी प्रतिमा शोधू लागले.

शब्दांकन-(प्रा.महंमद शेख सर (N.E. S. म्हसळा)

ताज्या बातम्या