अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या विभाग प्रमुख म्हणून आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज यांची नियुक्ती  

( लोहा/प्रतिनिधी दत्ता कुरावाडे )

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या केंद्रीय कमिटी संत वाड:मय प्रचार आणि प्रसार विभाग प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध भागवताचार्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्तीचे पञ राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांनी दिले आहे.

प्रसिद्ध भागवताचार्य आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी वयाच्या अवघ्या बारा वर्षांपासून विविध संताचे चरिञ, किर्तन, प्रवचन, भागवत, महाभारत, रामायण, शिवचरिञ कथा, साई चरिञ कथा, गणेश महात्म्य, कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. आध्यात्मिक विचारांच्या प्रबोधनातून आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्य महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा, तरूणातील व्यसनाधिनता,आराजकता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करित असून अनेकांनी त्यांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यसनमुक्ती केली आहे. बाल विवाह, स्ञीभ्रण हत्या, हुंडाबळी, गोहत्या बंदी, आई वडीलांची सेवा करावी या विषयी कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आदी राज्यात त्यांनी तब्बल सोळा वर्षांपासून हजारो कथा सांगितलेल्या आहेत. सध्या अधिक मासानिमित महाराज अनुष्ठानाला सुरूवात केली असून जागतिक महामारी कोरोनातून प्रत्येक जीव सुरक्षित रहावा, देश कोरोनामुक व्हावा, अशी प्रार्थनाही  केली आहे. 

अखिल भारतीय वारकरी मंडळांच्या संत वाड:मय प्रचार आणि प्रसार विभाग प्रमुख म्हणून आचार्य गजेंद्र चैतन्य महाराज यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या असंख्य भक्तानी  अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

समाजहिताच्या दृष्टिकोनातून आपले समाजसेवेचे कार्य अविरतपणे सुरूच राहील असे आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्य महाराज यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. 
या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र पञकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष नरेन्द्र येरावार यांनी अभिनंदन केले आहे….

ताज्या बातम्या