आम आदमी पार्टी मेक इंडिया नंबर वन मोहिमची कंधार येथे सुरुवात.

[ प्रतिनिधी – ज्ञानेश्वर यादव ]
सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ” Make India Number One ” या मोहिमेची सुरुवात केली आहे. कंधार तालुक्यात या मोहिमेला बळ देण्यासाठी आम आदमी पार्टी कंधार च्या वतीने सभासद नोंदणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. अशी माहिती आम आदमी पार्टी कंधार तालुका अध्यक्ष साईनाथ मळगे यांनी दिली.
दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्राम गृह, कंधार येथे आम आदमी पार्टीची बैठक पार पडली
या वेळी बोलताना साईनाथ मळगे म्हणाले कि, सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ” Make India Number One ” या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेत त्यांनी आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार आणि महिलांना समान अधिकार या पाच गोष्टींवर भर दिला आहे. कंधार तालुक्यात या मोहोमेला बळकटी देण्यासाठी आम आदमी पार्टी कंधार च्या वतीने लवकरच सभासद नोंदणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
या वेळी साईनाथ मळगे, तालुकाध्यक्ष आम आदमी पार्टी, कंधार विठ्ठलराव डांगे, नितीन भोसीकर तालुका सचिव, बबन केंद्रे तालुका उपाध्यक्ष, तिरुपती इंगळे तालुका उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर यादव कौठा सर्कल प्रमुख, सरोज मोरे तालुका प्रसिद्धीप्रमुख आदिची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या