शंभर टक्के विद्यार्थ्यांनी आवळा या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करणारी हिप्परगाथडी ही महाराष्ट्र राज्यातील पहिली शाळा.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवाडा अभियान अंतर्गत व शिक्षक सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष श्री बालाजी लच्छागोड गेंदेवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगाथडी (ता.बिलोली,जि.नांदेड) या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी आवळा या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली शाळा ठरली. तेलंगाना सीमा भागातील अनेक शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करत असतात.
 सामाजिक जाणीव ठेवून सातत्याने सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवणारे शिक्षक सेना कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा करत असतात. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवाडा अभियान अंतर्गत आणि शिक्षक सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष श्री बालाजी लच्छागोड गेंदेवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बिलोली येथे दि १४ जुलै २०२३ रोज शुक्रवारी, 48 झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात 1008 डॉक्टर विरुपाक्ष महाराज (मन्मथ स्वामी मंदिर, मांजरसुंबा),तहसीलदार श्री श्रीकांत निळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री नागेश लखमावाड, बिलोलीचे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर, यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात झाली.
डॉ. सुनिल कदम,डॉ. सूर्यवंशी,ॲड. दिगंबरराव कुंचेलीकर
,इंद्रजीत तुडमे,मारुती पटाईत,अनुदत्त रायकंटवार ,सचिन अंबेराव ,अंबादास सोमपुरे,शिवदास मठपती,विजय भोपळे,विठ्ठल चंदनकर,शंकरराव हमंद राजाराम कसलोड,साईनाथ राचेवाड ,शिवराज गागिलगे,इरेश्याम झंम्पलकर, लक्ष्मणराव बोधनकर, श्रीनिवास नरोड,अनिल गायकवाड,त्र्यंबक पाटील,अजय कोंडलवाडे,गंगाधर रामटक्के,धरमुरे पाटील,माधव शिंदे,बंडू गुजरवाड,शिवराज अपराजे,बसवन्ना बरबडे,प्रदीप कुंचेलीकर,नागेश मठपती,मनोहर शिरगिरे,शेख युनूस,वैजनाथ बोडके,गोपाळ उरुडवाडेकर,देविदास वाघेकर,बाबुराव गौड,पिराजी कारकून,रमेश कारकून,राजेश कारकून,नागनाथ गाजेवार,विश्वनाथ गायकवाड ,साई पापुलवार,मारुती हरणे,दुर्गेश बाशवेनी,शैलेश मठपती,शुभम मठपती,शिवशंकर जक्कावाड,शैलेंद्र गुप्ता,पवन अमृतवाड,प्रवीण अमृतवाड,राजू कसलोड,अभिजीत हसगुळे, ओंकार हसगुळे,वैभव गेंदेवाड,सय्यद रियाज यांनी वृक्षारोपण केलें. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगाथडी (ता.बिलोली,जि.नांदेड) या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी आवळा या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली शाळा ठरली.
वृक्षारोपणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी बी एम पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी श्री येसके , विषय तज्ञ श्री हलगरे , श्री राठोड, आळंदीचे मुख्याध्यापक श्री काठेवाड , गावातील सरपंच श्री रहेर बेग, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री इलियास पटेल, ग्रामपंचायत सदस्य श्री तुकडे, श्री इरफान , श्री नागराज एडकेवार, शिक्षक सेनेचे सचिव श्री राजाराम कसलोड , उपाध्यक्ष श्री शिवराज गागिलगे, शाळेचे मुख्याध्यापक श्री मुत्येपोड , श्री चौहान , श्री गायकवाड , श्री सगरोळीकर , श्री संगेवार , सौ. देशपांडे , सायकल मॅन तथा पर्यावरण प्रेमी शिक्षक श्री बालाजी गेंदेवाड इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवाडा अभियान अंतर्गत व शिक्षक सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष श्री बालाजी लच्छागोड गेंदेवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगाथडी (ता.बिलोली,जि.नांदेड) या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी 135 आवळा रोपटे अर्थात आवळा या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या