के .रामलु शाळेत हरिनामाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी !

●● जागतिक खेळाडू मार्शल आर्ट किक्क बॉक्सर टि. प्रतिभा यांचे मार्गदर्शन.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
    येथील के रामलू पब्लिक स्कुल मध्ये दिनांक ३० रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून हरिनामाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावेळी जागतिक खेळाडू मार्शल आर्ट किक्क बॉक्सर टी . प्रतिभा यांच्या स्वागतार्त वारकरी दिंडी व पालखी सोहळा संपन्न झाला. यात वर्ग पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी वारकरी व विठ्ठल -रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झाले .

आषाढी एकादशी

    याप्रसंगी जागतिक खेळाडू मार्शल आर्ट किक्क बॉक्सर कु. प्रतिभा थक्कडपल्ली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लक्ष्य प्राप्तीसाठी कठीण परिश्रम आणि सकस आहाराची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले
         यावेळी शाळेचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार, सचिव यशवंत संगमवार,संचालिका रमा ठक्कूरवार, प्राचार्य टी नरसिंगराव,टी शामला, टी. प्रतिभा, टी. विजयराघवेंद्र आदी नॅशनल बॅडमिंटन खेळाडू हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीतील विद्यार्थिनी कुमारी प्रतिभा शिंदे व हासिनी म्हैसेवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन कागळे आर.डी.यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या