कंटेनर – कारच्या अपघातात कुंडलवाडीच्या तीन तरुणांचा मृत्यू ; तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात घडली घटना !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील रहिवासी असलेले काही तरुण हे तेलंगणा राज्यात कामानिमित्य गेले असता दिनांक 12 रोजी मध्यरात्री 1 : 30 च्या सुमारास निझामबाद जिल्हात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर कंटेनर व कारचा सामोरा समोर भीषण अपघात होऊन तीन तरुण ठार झाले आहेत.

कुंडलवाडी शहरातील गणेश हानमलू निरडी वय 26,आदित्य हानमलू निरडी वय 23,प्रकाश सायलू अंकलवार वय 22 आदी तरुण हे तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे काही कामानिमित्त गेले असता, हैद्राबाद येथून कुंडलवाडी कडे येत असताना दिनांक 12 रोजी मध्यरात्री 1: 30 च्या सुमारास निझामबाद जिल्हातील इंदलवाई मंडलातील चंद्रायनपल्ली येथे कार क्रमांक AP 29 AD 7909 व कंटेनर क्रमांक HR 38 U 7281 या गाडीचा समोरासमोर भरधाव वेगात भीषण अपघात होऊन वरील तीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी निझामबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.मृतदेहावर शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या अपघातातील तीन मुलांपैकी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाधर निरडी यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे कुंडलवाडी शहरावर शोककळा पसरून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या