कुंडलवाडी धर्माबाद रोडवर कारने विद्युत पोलला दिली धडक ; दोन जण जखमी

(कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे)
            कुंडलवाडी धर्माबाद या राज्यमहामार्गाचे काम चालू असून या मार्गावरील काही भागाच्या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत,त्यामुळे अनेक वाहनाचा अपघात होताना दिसून येत आहेत.

 आज दिनांक 11 रोजी दुपारी दोनच्या सुमारास तेलंगणातील भेंसा येथील रहिवाशी असलेले कुटूंब हे वाहन क्रमांक टी एस 08 एच बी 6915 या वाहनाने भेंसा येथून बिलोलीकडे जात असतांना रस्त्याच्या कडेला चालू असलेल्या विद्युत पोलला जबर धडक दिली आहे.
त्यात दोन व्यक्ती जखमी झाले आहेत, सदरील धडक ही विद्युत पोलला जोरात बसल्यामुळे विद्युत पोल पूर्णतः तुटलेला आहे. त्यामुळे काही काळासाठी शेतीसाठी विद्युत पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. सदरील जखमींना कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या