बिलोली आगाराची बस निजामबाद बिलोली भरधाव वेगाने धावताना दुचाकीला समोरासमोर धडकल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दिनांक ०७ एप्रिल रोजी दुपारी ०३:०० वाजता घडली आहे.
सदर घटनेतील दुचाकी स्वार शेख अब्बास, राहणार कोपरगाव हे आपल्या मुलीसह बिलोली वरून बोधन या मार्गाने जात असताना बिलोली आगाराची बस क्रमांक एम एच 14 बी टी २२५६ ही बस निजामबाद कडून वेगाने येत असताना सालुरा चेक पोस्ट जवळ 100 मीटरवर असलेल्या पेट्रोल पंप समोर धडक दिली.
बसचा टायर मुलीच्या अंगावरून गेल्यामुळे दहा वर्षाची मुलगी ही जागीच मरण पावली. तर दुचाकी चालक मुलीचा पिता यास पायाला जबर मार लागला.
सदरील घटना घडल्यानंतर नागरिकांनी दृश्य पाहून बस चालकाचा शोध घेतला. त्यादरम्यान चालक पळाला असल्याचे ऐकवास मिळाले. सदरील मुलीचा मृतदेह पाहून नागरिक हळहळ व्यक्त करत होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy