नरसी ते गडगा मार्गावर टाटा सुमो व दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर एक गंंभीर‌ !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी : गजानन चौधरी ]
       नायगाव तालुक्यातील नरसी ते गडगा रोडवर कोपरा पाटी जवळ टाटा सुमो व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला असून यामध्ये एक जन ठार तर एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे हलविण्यात आले आहे.

      नरसी ते गडगा मार्गावर कोपरा पाटी जवळ चार चाकी वाहन (टाटा सुमो क्र.एम.एच.29 ए.डी.4180) व दुचाकी ( क्र.एम.एच.26 सी.बी.6555 ) यांचा दि.28 आॅगस्ट 2022 रोजी दुपारी चार ते साडेचार च्या दरम्यान समोरासमोर जबर धडक बसल्याने अपघात झाला असून यामध्ये औराळा येथील दुचाचाकीस्वार दिपक पवार यांचा मृत्यू झाला असून अन्य एक जन जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
  जखमींना ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे हलविण्यात आले असून पुढील तपास नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे हे करत आहेत. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या