नायगाव शहरात अग्निपंख अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा संपन्न !

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]

पहिल्यांदाच नायगाव शहरात ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनी साठी अल्प दरात अग्निपंख अभ्यासिका केंद्र उघडण्यात आले असून पहिल्याच दिवशी 45 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या अग्निपंख अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन मोहनराव पाटील सुगावकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, माधवराव बेळगे, वसंत सावकार मेडेवार, पंकज पाटील चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अग्निपंख अभ्यासिकेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व विविध क्षेत्रातील स्पर्धकांना माजी प्राचार्य बि. डी. इंगळे, प्राचार्य डॉ. के हरि बाबू, डॉ. शंकर गड्डमवार, प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, प्राचार्य के.व्ही फाजगे,प्रा पीडी जाधव,प्रथा. एम पी पाटील यांचे शैक्षणिक मार्गदर्शन लाभणार आहे.
नायगाव शहरातील व तालुक्यातील शालेय विद्यार्थी व कॉलेज विद्यार्थी आणि विविध प्रकारच्या स्पर्धकासाठी एक चांगला उपक्रम नायगाव शहरात महत्त्वपूर्ण गरजेचा होता या अनुषंगाने अग्निपंख अभ्यासिका केंद्राची निर्मिती करण्यात आली असून या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक श्री संत बाळगीर महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहनराव पाटील सुगावकर तर अध्यक्षस्थानी वसंत सावकार मेडेवार यासह खरेदी विक्री महासंघाचे तालुका चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण, माधवराव बेळगे, श्रावण पाटील भिलवंडे, संभाजी पाटील भिलवंडे, प्राचार्य मनोहर पवार, प्राचार्य डॉ.के. हरिबाबु, डॉ. शंकर गड्डमवार, प्राचार्य के जी सूर्यवंशी, प्राचार्य के व्ही फाजगे, अग्निपंख अभ्यासिकेचे मार्गदर्शक दत्तामामा येवते, सदानंद सावकार मेडेवार,हभप पंढरीनाथ महाराज पळसगावकर ,प्रा.पीडी जाधव,प्रा. एम पी पाटील, गजानन पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील श्री बालाजी ऑइल मिल मेडेवार नवीन कॉम्प्लेक्स येथे सुसज्ज इमारतीमध्ये अग्निपंख अभ्यासिका केंद्र स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला ऊर्जा देण्यासाठी व सहजरित्या यशाचे शिखर गाठण्याकरिता हे पवित्र शैक्षणिक कार्य उद्धव अशोकराव पा. चिंचाळे, माधव पाटील चिंचाळे, केशव पाटील चिंचाळे, शिवम पाटील चिंचाळे यांनी हाती घेतले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नायगाव शहरात अग्निपंख अभ्यासिका केंद्राचा विद्यार्थी विद्यार्थिनी व स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहनही चिंचाळे परिवाराने केले आहे, सदर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन दत्तामामा येवते यांनी केले तर आभार उद्धव चिंचाळे यांनी मांनले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या