कंधार तालुक्यातील विदेशी भाजीपाला बिजोत्पादन करणारे शेतकरी संतोष गवारे यांचा सपत्निक सन्मान !!

[मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क]
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने नवा मोंढा, नांदेड येथील मैदानावर जिल्हा कृषि महोत्सव सुरू आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, शेतकरी गट ,शेतकरी उत्पादक कंपनी , महिला बचत गट , प्रक्रिया उद्योग करणारे गट आदींचा सन्मान करून गौरव करण्यात आला.

शेतकऱ्यांना उपजत असलेले ज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे. पिढ्यानपिढ्या जपलेल्या या ज्ञानाला अधुनिकतेची जोड देण्यासाठी नव्या पिढीतील युवकांनी पुढे आले पाहिजे, व जे शेतकरी पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन प्रगती साधत आहेत अश्या शेतकऱ्यांना कौतूक व्हावे यासाठी कृषि महोत्सवात प्रत्येक तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रत्येक तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी याप्रमाणे 16 शेतकऱ्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

यात कंधार तालुक्यातील लाठ खु.येथील भाजीपाला बिजोत्पादन करणारे आदर्श शेतकरी संतोष प्रभाकर गवारे यांचा समावेश आहे. शेतकरी संतोष गवारे यांनी त्यांच्या पत्नी कविताताई गवारे सह कुटुंबानी हा सत्कार स्वीकारला.
या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषि अधिकारी सुरेंद्र पवार, अनिल चिरफुले, राजकुमार रणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.माधुरी रेवणवार आदी उपस्थित होते.
संतोष प्रभाकर गवारे हे मागील, तिन ते चार, वर्षापासून भाजीपाला बिजोत्पादनाची शेती करीत असून त्यांची हि शेती तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. सिंजंटा, मनसेंटा, महिको आदी कंपन्यासोबत हि शेती करीत असून एकूण 8 शेडनेट मधून झुकेनी, मिरची, टोमॅटो, काकडी आदी भाजीपाला पिकाचे आधुनिक पद्धतीने बिजोत्पादन करीत आहेत. या मधून दरवर्षी लाखो रुपयाचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.
या साठी त्यांना कृषी विभाग,संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गवारे यांनी लाठ खु .सह परिसरातील अनेक शेतकऱ्यांना या शेतीसाठी प्रेरित केले आहे.पंचक्रोशीत लाठ खु. हे शेडनेट चे गाव म्हणून प्रसिद्ध झाले असून येथील शेतकरी दरवर्षी कोट्यावधीची उलाढाल करीत आहेत. नाबार्ड, कृषीविभाग, कृषी विज्ञान केंद्र, सिंजंटा सह इतर कंपन्या यांचे सहकार्य व मार्गदर्शनामुळे आज लाठ खु. हे गाव जिल्ह्याच्या नकाशावर आले आहे.
संतोष गवारे यांच्या कार्याची दखल घेऊन सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राने मागच्याच महिन्यात त्यांचा सन्मान केला होता आता कृषी विभागानेही जिल्हा कृषी महोत्सवात सपत्निक सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या