कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

• 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय ; माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांची खेळी यशस्वी…

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित संगमेश्वर शेतकरी विकास पॅनल ने 18 पैकी 17 जागेवर दणदणीत विजय मिळवित भाजपा प्रणित कुंडलेश्वर शेतकरी विकास पॅनलचा दारुण पराभव करून बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे..

कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी मतदान प्रक्रिया दिनांक सात रोजी पार पडून दिनांक आठ रोजी नगरपालिका सभागृह येथे मतमोजणी पार पडली आहे. महाविकास आघाडी प्रणित संगमेश्वर शेतकरी पॅनल ने 18 पैकी 17 जागेवर विजय मिळविला आहे तर भाजपच्या कुंडलेश्वर शेतकरी विकास पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.यामधील मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : विविध सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघ ऐबडवार सुनील 122 मते, कदम अशोक 107, चंदनकर संतोष 117, भाले बाबाराव 130, यरकलवाड राजेंद्र 108, लखमपुरे हनमंत 130, शिंदे आनंदराव 124, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघ ढगे देवणबाई 124, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ मेहेत्रे कोंडीबा 127, सेवा सहकारी इतर मागास मतदारसंघ मोहमद खय्युम 116, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ नरवाडे माधव 99, शिंदे साहेबराव 99, ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या मागास मतदारसंघ साईनाथ निवळे 120, ग्रामपंचायत अनुजाती जमाती मतदार संघ पतंगे सिद्धार्थ 131, हमाल मापाडी मतदारसंघ वारेवार शंकर 81,असे उमेदवार विजयी झाले आहेत तर व्यापारी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राजेश्वर उत्तरवार,रमेश दाचावार,हे बिनविरोध निवडून आले आहेत. 18 जागेपैकी 17 जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे पुन्हा एकदा कुंडलवाडी बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर जी कोरवार,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बी पी तलारवार, सचिव लक्ष्मीकांत येपुरवार,यांनी काम पाहिले आहे.मतमोजणी केंद्राबाहेर सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित कासले, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे….

• हमाल मापाडी मतदारसंघात महाविकास आघाडीला फटका
हमाल मापाडी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून जायेवार मारोती यांना उमेदवारी देण्यात आली होती,पण काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळी व योग्य उमेदवार न दिल्याची नाराजगी याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे.या मतदारसंघातून भाजपाकडून एकमेव वारेवार शंकर हे विजयी विजयी झाले आहे तर उर्वरित सर्व जागेवर भाजपाचा दारुण पराभव झाल्यामुळे भाजपाला ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या