17 विरुद्ध 10 उमेदवारांची लढत रंगणार की, बत्ती गुल होणार. मतदारांमध्ये चर्चा !
सत्ताधारी पक्षांचा मलिदा चाटण्यासाठी गंगाधर बडुरे शिंदे गटात सामील झाले आहेत म्हणून त्यांच्या उमेदवारी सह इतर दोघांनाही भाजपा स्थानिक नेत्यांनी सोबत घेतले नाही अशी चर्चा मात्र कुंटूर परीसरात होत आहे.तर दोन पत्रकाराची उमेदवारी कायम असावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्याकडून तरी योग्य न्याय मिळेल अशी ही चर्चा होत आहे.
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे कुंटुर कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याची चर्चा सध्या कुंटूर परिसरात रंगतदार बनली आहे. त्यामध्ये भाजप ,काँग्रेस, सहित सर्व पक्ष एकत्र विलीनीकरण होऊन अपक्षाची टक्कर घेत असल्याचे चित्र दिसत आहे , एकूण 43 उमेदवार रिंगणात आहेत ,त्यापैकी 10 अपक्ष आहेत. 33 उमेदवार पार्टी प्रमुख पक्षाचे आहेत. त्या पक्षातील 17 उमेदवाराला निवडणूक चिन्ह मिळाले असल्याने ते मैदानात उतरले आहेत, बाकी 16 जणांनी जाहीर पाठिंबा दिल्याने परिपत्रक काढून आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत असे स्पष्ट करून टाकले आहे , त्यामुळे 17 विरुद्ध 10 अपक्ष सर्वपक्षाविरुद्ध अपक्ष अशी सरळ लढत कुंटुर बाजार समिती मध्ये होणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1997 मध्ये झाली तेव्हापासून पहिल्यांदा निवडणूक 2009 मध्ये झाली होती.काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीवर होती त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक होणार म्हणून प्रशासक लागले त्यानंतर महाविकास आघाडीनेचे सत्तेतील काही प्रमुख सभापती म्हणून प्रशासकीय सभापती म्हणून निवडले पुन्हा प्रशासक लागले एकूण अंदाजे 13 वर्षाच्या कार्यकाळाच्या नंतर कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली, त्यामुळे सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य व इतर हमाल मापाडी यांना मतदानाचा अधिकार 13 वर्षाच्या नंतर मिळाल्याने काही जाणकारातून मत व्यक्त होत आहे
त्यामुळे पुन्हा सत्ता आपल्याच ताब्यात यावी व बिनविरोध व्हावी असे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी हा डावपेच खेळले असल्याची ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे . सध्या 43 उमेदवार रिंगणात होते काही उमेदवारांना शेवटच्या दिवशी माघार घेण्यासाठी तांत्रिक अडचण आली असल्याचे पक्षाचे कार्यकर्ते सांगितले.
16 उमेदवारांना माघार घेता आली नाही त्यामुळे त्यांनी 16 उमेदवारांनी त्या 17 उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला म्हणून सर्व पक्ष एकत्र येऊन 17 उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बीजेपी काँग्रेस व इतर पक्ष एकत्र येऊन अपक्षाची लढाई करणार असल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट आहे. त्यामुळे कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा सत्ता सर्व पक्षीय सदस्यची येईल का? शेतकरी विकास पॅनल कडे राहील या अपक्षाकडे जाईल हे मात्र सांगता येत नाही कारण सर्व मतदार जागृत आहेत.मागील संचालक यांना शेतकऱ्यांची कळवळा व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही व पुढील सोडता येतील का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नवतरुण व अपक्ष उमेदवाराला मतदार तारतील का किंवा पुन्हा सत्ताधाऱ्याकडे सत्ता जाईल का हे चित्र येथे 28 तारखेला मतदान झाल्यानंतर स्पष्ट होईल अशी चर्चाही परिसरामध्ये जोरदार सुरू आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy