वरवठणे आणि सकलप येथे शेती विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न !

[ रायगड म्हसळा/प्रतिनिधि – प्रा.अंगद कांबळे ]
दि-२४ सप्टेंबर २०२१ रोजी रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने knowledge for wheeler या कार्यक्रमांतर्गत वरवठ्णे तसेच सकलप येथे शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री. कुसाळकर सर यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी सहाय्यक श्री.धनंजय सरदेसाई यांनी कृषि संबंधित माहिती तसेच शासनाकडून सद्या सुरू असलेल्या योजना गोपीनाथ मुंडे अपघात विमा,काढणी यंत्र, फळबाग लागवड,त्याच बरोबर  www.Mahadbt.com पोर्टल या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच रिलायन्स फाऊंडेशन चे कार्यक्रम अधिकारी योगेश मेंदाडकर यांनी ही रिलायन्स फाऊंडेशन संदर्भात माहिती दिली.
तसेच रिलायन्स हेल्पलाईन १८००४१९८८०० संदर्भात माहिती दिली तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधून माहिती मिळवावी यासाठी आवाहन केले. या वेळी २६ शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या