नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न विशेष बैठकीतून मार्गी लावणार – ना .अजित दादा पवार !

अजित दादा च्या हस्ते नरसी येथे हजारो समर्थकांसह माजी खा खतगावकर यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश !

[ नायगांव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

   अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच नांदेड जिल्हयातील प्रलंबीत जलसिंचनाचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक विषेश बैठक जलसिंचन मंत्र्यांना घेऊ गोदावरी मनार च्या प्रश्नावर बैठक घेण्याच्या सुचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना देवून नांदेड सह मराठवाड्याच्या विकासासाठी मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास हाच माझा श्वास असल्याची कबुली दिली .
 नरसी (ता नायगांव ) येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी आयोजीत केलेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री नवाब मलिक आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार राजू नवघरे आमदार संजय बनसोडे आमदार राजेश विटेकर ,माजी ,माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर डॉ मिनल पाटील खतगांवकर ओमप्रकाश पोकर्णा आमदार विक्रम काळे माजी आ.मोहन अण्णा हंबर्डे,अविनाश घाटे व्यंकटराव गोजेगांवकर,दिलीप धर्माधिकारी, बाळासाहेब रावनगावकर प्रदेश प्रवक्ता सुरज चव्हण ,वसंत सुगावे,शिवराज पाटील,प्रवीण पाटील यासह राष्ट्रवादी चे पदाधिकारी सहआदिची उपस्थिती होती .
     कांग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर डॉ मिनल पाटील खतगांवकर,माजी आ.पोकर्णा यांच्यासह अनेक हजारो समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काग्रेस पार्टीत प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी मान्यवर यांच्या उपस्थित राष्ट्रवादी पार्टीत प्रदेश केला 
   पक्ष प्रवेश प्रसंगी माजी खा . भास्करराव पाटील खतगावकर रानी मांडलेल्या प्रलंबीत विकास प्रश्नाचा धागा पकडून अजित पवार म्हणाले की नांदेड जिल्हया तील लेंडी प्रकल्प मानार प्रकल्प तसेच कोलंबी लिफ्ट येरिकेशन हे जल सिंचनचे प्रश्न तसेच नरसी बोधन मुखेड तसेच नांदेड हैद्राबाद रस्त्याचे चौपदरी करन करणे आणि गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थ संकल्पीय अधिवेशन संपताच एक विशेष बैठक जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच जलसिंचन विभागाचे मत्री गिरीष महाजन यांना सोबत घेत सहकार मंत्री बाबासाहब पाटील यांनी बैठक बोलवावी त्यातून ते प्रश्न तात्काळ मार्गी लावू अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली .
       राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची भूमीका विषद करताना अजित पवार म्हणाले की १९९९ ला जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हा सर्व समाज घटकांना सोबत घेवून एकाच विचार धारेवर चालणारा पक्ष म्हणून पुढे आला आम्ही काही मतभेद जरूर असतात पण राज्य व राष्ट्रहित पहाता आपल्या मुळ आम्ही टिकून आहोत असे म्हणत एका विचार धारेला सोबत घेत राज्यामधये आम्ही महायुतीच्य माध्यमातून सतेत आलोत असे सांगितले.
  नरसी तालुका नायगांव येथे रविवार माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर डॉ मिनल खतगांवकर यांचा पक्ष प्रवेश सोहळा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणासाठी एक नव्या संकल्पाची सुरुवात आहे असे सांगून भास्करराव खतगांवकर व मिनल खतगांवकर यांना लवकरच पक्ष जबाबदारी देणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. 
   माजी खा भास्करराव पाटील खतगावकर आपल्या भाषणात म्हणाले की गेली ३५ वर्ष राजकारन करताना समाज हित डोळया समोर ठेवून जिल्हयाचे विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले अनेक प्रश्न प्रलंबीत असून ते मार्गी लाववावेत अशी अपेक्षा व्यक्त केली . L
काँग्रेसच्या स्वकियांनी धोका दिला डॉ मिनलताई खतगावकर प्रास्ताविक भाषणातून डॉ. मिनल खतगांवकर यांनी लोकांची कामे सोडवण्यासाठी नायगाव विधान सभा लढवली पण स्वकीयानी विरोधी उमेदवार सोबत संगनमत करून धोका दिला म्हणून ८० हजाराच्या वर मत दान घेऊन सुद्धा मला पराभवास सामोरे जावे लागले माझी ही अवस्था तर माझ्या कार्यकर्त्यांचे भविष्य अंधारात दिसल्याने आम्ही परखड विचाराच्या राष्ट्रवादी ची निवड केली असे बोलत नाव न घेता खा रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला..या वेळी अशोक मुगावकर,माजी आ.पोकर्णाआमदार चिखलीकर, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आदींने विचार मांडले.
माजी खा.खतगावकर यांनी राजकारणातील जुन्या आठवणींना उजाळा देताना सुधाकरराव नाईक मंत्री मंडळात मला मंत्री शंकरराव चव्हाणांनी नाही तर शरद पवारांनी केले असे म्हणत शरद पवार यांच्या उपकाराची जाणीव करून दिली ,नंतर मला डावलून अशोकराव चव्हाण यांना ही मंत्री त्यांनीच केले त्यामुळे ही आठवण कायम राहणार असे सांगितले.खतगावकर यांनी मीनल ताई च्या पुनर्वसनावर बोलताना तुमचे जसे दोन मूल तशी ही तुमची मुलगी समजून मीनल ताई च्या पुनर्वसनावर बोलताना तुम्ही योग्यता पाहून संधी द्या त्यात मी समाधानी आहे असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या व घोषणा देत प्रतिसाद दिला.
&&&&&&&&&&&&&&&

■ बलाढ्य पक्ष प्रवेश सोहळा ■

*********************
यावेळी पक्ष प्रवेश सोहळ्यात माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर, डॉ मिनल पाटील खतगावकर ,यांच्या समवेत रवि पा खतगांवकर, बालासाहेब पाटील खतगावकर,माजी आ. महापौर ओम प्रकाश पोकर्णा सुरजित सिंग गिल, अशोक पाटील मुगावकर, शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भिलवंडे , जिल्हा प.माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, मंगल देशमुख, प्रताप जिगळेकर ,राजू गंदीगुडे गणेशराव करखेलीकर,भाजप तालुका अध्यक्ष बिराजदार,माजी सभापती आनंदराव शिवारेडी,नागनाथ आनंतवाड , यांच्यासह तीनशे सरपंच, चेअरमन माजी जिल्ला परिषद पंचायत समिती सदस्य ,हजारो कार्यकर्ते महिला यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीत प्रवेश केला
&&&&&&&&&&&&&&

● सुगावे यांच्या कडे घुंगराळा येथे चहा पान ●

नरसी येथे पक्ष प्रवेश सोहळ्याला नांदेड हून बाय रोड जाताना घुंग्राळा तालुका नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव वसंत सुगावे यांच्या निवास स्थानी सर्व मान्यवर यांनी चहापान घेतल.
**********************

● नायगाव मध्ये होटाळकरानी केलं जेसीबी ने हार घालून जंगी स्वागत ●

 ++++++++++++++++++
नरसी येथील पक्ष प्रवेश सोहळा आटोपून परत नांदेड कडे जाताना शिवराज पाटील होटाळकर यांच्या निवास स्थाना समोर नायगाव मध्ये होटाळकरानी जेसीबी ने हार घालून जंगी स्वागत केले.
    कॅम्पस मध्ये स्वर्गीय डी बी पाटील यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून चहापान व स्वागत सोहळा घेण्यात आला. यावेळी होटाळकर यांनी बाभळी बंधारा व मन्याड धरण बाबद उपस्थित केलेल्या प्रश्नावर उद्या संभाजीनगर मध्ये दौऱ्यात बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन उपस्थित कार्यकर्ते व शेतकरी यांच्या समोर बोलताना दिले.आश्रम शाळा अनुदान, टपावाढ अनुदान, आदी विषयावर शिक्षक बांधवांनी यावेळी निवेदने दिली.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या