अल ईम्रान प्रतिष्ठान च्या वतीने विटभट्टीवरील शालेय मुलांचे प्रबोधन 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       बालमजुरी मुक्त चळवळ महाराष्ट्र व अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली,जिल्हा परिषद शाळा अर्जापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जापूर ता.बिलोली येथील विटभट्टीवर प्रत्यक्ष भेट देऊन तेथे काम करणा-या शालेय विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन करुन लहान मुलांना जवळच्या शाळेत पाठविण्याची तात्पुरती व्यवस्था करुन प्रबोधन करण्यात आले.
       दि १४ नोंव्हेंबर ते २० नोंव्हेंबर २०२२ या दरम्यान बाल हक्क सप्ताह साजरा करण्यात येतो.बाल मजुरी मुक्त चळवळीचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली तालुक्यात अल ईम्रान प्रतिष्ठान संस्था काम करित आहे.तालुक्यातील अर्जापूर सह कुंडलवाडी रोड,चिरली,राहेर या परिसरात मोठ्या प्रमाणात विटभट्टी आहे.येथे काम करणा-या कामगांराचे स्थलांतर होत असते.याठिकाणी त्यांचे आठ ते नऊ महिने मुक्काम असतो. कामगांरासोबत त्यांची मुले पण असतात.ईयत्ता १ ते ८ वी वर्गात शिकत असलेली मुले,मुली हे सोबत असतात.तर काही मुले लहान आहेत.या मुलांचे शिक्षण वाया जाऊ नये,यांना जवळच्या शाळेत वर्गानूसार तात्पुरत्या स्वरुपात बसण्याची व्यवस्था करुन त्यांना पुस्तके, वह्या, ई.देण्याची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी अल ईम्रान प्रतिष्ठान चे अध्यक्ष मोहसीन खान, जि.प.शाळा चे मुख्याध्यापक शेख.सलीम शेख.खुर्शिद, सहशिक्षक मरकंटे डी.वाय,विद्यार्थीं,पालक,कांमगार उपस्थित होते.
—————————————-
बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या विटभट्टीवर आपल्या आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांचा शोध घेऊन या मुलांनी शाळेत यावे,त्यांना दररोज जवळच्या शाळेत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.
( मोहसीन खान,अध्यक्ष अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली )
————————————— 
आमच्या शाळेच्या परिसरातील विटभट्टीवर काम करित असलेल्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले.त्यांच्या मुलांना वर्गानुरुप प्रवेश दिला जाईल किंवा त्यांना वर्गात बसु दिले जाईल. तसेच शाळेतर्फे पाठ्यपुस्तके देण्यात येईल.
( शेख.सलीम, मुख्याध्यापक जि.प.शाळा अर्जापूर )

ताज्या बातम्या