अलिबाग तालुक्यातील रामराज मराठा अळीतील शेकाप कार्यकर्त्यांचा महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील रामराज या ग्रामपंचायत मध्ये शेकापला हदरा देत शेकाप चे जेष्ठ कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिंदे व मनोज दासगावकर सहित रामराज मराठा अळीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मा.आमदार महेंद्रशेट दळवी यांच्या उपस्थितीत भगव्या झेंड्याखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या वेळी माजी पंचायत समिती सभापती मा.बाळाशेठ तेलगे, जेष्ठ शिवसैनिक कृष्णाभाई म्हात्रे, उप तालुका प्रमुख आप्पा पालकर, युवासेना तालुका अधिकारी अजय गायकर, थळ विभाग प्रमुख अरुण कवळे, जेष्ठ शिवसैनिक विजय म्हात्रे, विभाग संघटक अमित म्हात्रे, उप विभाग प्रमुख महेश शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या