अलिबाग रायगड खारेपाटात शेकापला खिंडार !

विजय गावंड यांचा शिवसेनेत प्रवेश; आ.महेंद्र दळवी, मानसी दळवी, राजा केणी यांच्या उपस्थित झाला पक्षप्रवेश !

[ अलिबाग प्रतिनिधी:- अभिप्राव पाटील ]
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारेपाटमध्ये शेकापला खिंडार पडले आहे. या विभागातील शेकापचे नेते विजय गावंड यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आ. महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या प्रतोद मानसी दळवी, तालुका प्रमुख राजा केणी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
राजमळा येथे मंगळवार दि.1 मार्च रोजी झालेल्या पक्षप्रवेशाकडे मागील काही दिवसांपासून तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, तालुका प्रमुख राजा केणी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विजय गावंड शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुणकुण काही दिवसांपासून येथील कार्यकर्ते व्यक्त करीत होते. त्यांचा प्रवेश रोखण्याचा प्रयत्न शेकापचे नेते करीत होते.
मात्र, त्यांना यश आले नाही. अखेर आज विजय गावंड यांनी शिवसेनेत आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख आ.महेंद्र दळवी, जिल्हा परिषद प्रतोद मानसी दळवी, शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केला. विजय गावंड यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खारेपाट विभागात शेकापला खिंडार पडले आहे. याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दिसू शकतात, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या