आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शेख रियाज चांदपाशा तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे यांची निवड करण्यात आली.
आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफचे प्रदेशाध्यक्ष एस.जी.शुत्तारी, महासचिव अशफाक सलामी यांच्या सूचनेनुसार माजी राष्ट्रीय सचिव फारूख अहमद, भाकपा नेते काॅ.प्रदिप नागापुरकर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.
यावेळी आमेर अरसिल, मोहम्मद कासिम, ईशान खान, अब्दुल समी यांची उपस्थिती होती. यावेळी अल्पसंख्यांक समाजात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक समस्यांवर जनजागृती करणारी, व अन्यायाविरूद्ध लढा देणारी देशपातळीवरील एकमेव संगठन ‘आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ’ ची नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी शेख रियाज चांदपाशा तर, जिल्हा महासचिव पदी वलियोद्दीन फारुखी , तर कार्याध्यक्षपदी सूनील सोनसाळे यांची निवड तसेच हरपाल सिंग गुलाटी, जिल्हा समन्वयक इर्शाद पटेल देगलूर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मलंग लोहा व म.मोईज धर्माबाद, मुख्य संघटक अब्दुल हकीम भोकर, सचिव शेख हुसेन रायवाडीकर, सहसचिव सद्दाम पटेल नरसीकर, कोषाध्यक्ष शेख आरिफ नायगाव, सह कोषाध्यक्ष हाफिज शेख असिमसाब कंधार, प्रसिध्दीप्रमुख मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सय्यद मुजीब अहमद मुदखेड, सय्यद नईम मुल्ला मुखेड, आदींची निवड करण्यात आली. याकार्यकारिणीचे मार्गदर्शक काॅ.प्रदिप नागापुरकर, काॅ. शेख गफारसाब सावरगावकर हे आहेत.
आगामी काळात भारतीय संविधानानुसार देशात समता, बंधूता, सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करून अल्पसंख्याक समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरूध्द जन आंदोलन उभारणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने केला आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy