अमरावती येथील महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डाँ.प्रविणजी आष्टीकर यांच्यावर कांही समाजकंठकानी शाई फेक करुन प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटना कळताच या घटनेचा बिलोली तालुका आर्य वैश्य (कोमटी) समाजाच्या वतीने तिव्र निषेधाच निवेदन मा.तहसिलदार निळे यांना आर्य वैश्य (कोमटी) समाज बांधवांनी दिला.
कर्तव्यदक्ष आयुक्त डाँ.प्रविण आष्टीकर यांच्यावर समाजकंठकानी शाई फेक केलेल्या घटनेचा तिव्र निषेध करण्यासाठी आर्य वैश्य कोमटी समाज कमिटीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण)श्री विजय व्यकटेश कुंचनवार यांनी आपले मत मांडले.
यावेळी अमरावती येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आर्य वैश्य कोमटी समाजाचे शहर अध्यक्ष बिलोली अदिनाथ गंगावार, शहर उपाध्यक्ष दत्ताञय अरगुलवार, ता.कोषाध्यक्ष सतिष बासटवार, साईनाथ अरगुलवार, सचिव सुरज कोतावार, सहसचिव प्रशांत पेंसलवार, हेमंत कुंचनवार, बालाजी कोत्तावार, संजय पत्तेवार, संजय गंदेवार यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy