अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन मध्ये अनिल बंडप्पा मुळे हे पी. एस. आय. वर्ग दोनच्या पदावर कार्यरत होते.दि. 13/08/2021 रोजी त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.
सदरील प्रकरण है वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देवून त्यांची वेतनवाढ रोखून बदलीला अडथळा निर्माण केला व आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर जाऊन त्यांचे लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले.त्यातील सर्व पुरावे नष्ट करून लॅपटॉपशी छेडछाड करण्यात आली.
त्यांच्या मोबाईलची सर्व माहिती व सीडीआर तपासावे.सदरील घटना अत्यंत दुर्दैवी असून एका कर्तव्यदक्ष तरुण पोलिस अधिका-यांचा वरिष्ठाच्या जाचाने अंत झाला आहे.
त्यांच्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याची ऑडीयो क्लीप ही वायरल झालेली आहे.
जाणीवपुर्वक त्रास देऊन आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठ अधिका-यांची सीबीआय मार्फत चौकशी करून मृत अनिल मुळे यांच्या पत्नी व दोन लहाण मुलांना न्याय द्यावा मिळवून द्यावा अशी विनंती सर्व समाज बांधव आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मारोती पाटील कागेरु (सभापती पंचायत समिती धर्माबाद), शिवराजभाऊ मोकलीकर (संचालक कृ.उ.बा.स.धर्माबाद), महाबळेश्वर पाटील (सामाजिक कार्यकर्ते), मन्मय अप्पा स्वामी ( तालुकाध्यक्ष जंगम समाज), शिवराज पा.गाडीवान (जिल्हाध्यक्ष बसव बिग्रेड),दिगांबर पा. सावळे ( ता अध्यक्ष प्रहार), प्रकाश पा.जायशेट (ता.उपाध्यक्ष शिवा संघटना), माधवराव पा. माळगे ( तंटामुक्ती अध्यक्ष रोशनगाव), गजानन पा चंदापूरे, (पत्रकार वतनवाला), हाणमंत पा.किरोडे (कार्याध्यक्ष राष्ट्रवादी), ललेश पा, मंगनाळीकर (भाजपा तालुका उपाध्यक्ष), साईनाथ पा. मोकलीकर (ता. उपाध्यक्ष कांग्रेस), सिध्देश्वर पा.शिवशेट्टे (युवा सरचिटणिस भाजपा), संजय बंटी पाटील (शहर अध्यक्ष शिवा संघटना), दिगांबर पा. खपाटे (सामाजिक कार्यकर्ते), दत्तात्रय पा.कावडे (मनसे जिल्हाउपाध्यक्ष), अनिल पा.मुंडकर (जिल्हा अध्यक्ष शिवा सोशल मीडिया), प्रविण पा.हाणमोड (मनसे विधानसभा अध्यक्ष), नागनाथ माळगे (मनसे तालुकाध्यक्ष), साईनाथ स्वामी (भाजयुमो तालुका उपाध्यक्ष), संतोष पा. साखरे (सामाजिक कार्यकर्ते), सज्जन गड्डोड (भाजपा शहर सरचिटणीस), संतोष पा.दर्यापूरे हाणमंत पा.कत्ते आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy