नायगाव येथील वैकुंठवासी ह.भ.प. अंबादास संगमनाथ मुनगीलवार मरवाळीकर यांचेवर अंत्यसंस्कार !

[ नायगाव प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील वैकुंठवासी ह. भ.प. अंबादास संगमनाथ मुनगीलवार मरवाळीकर यांचे दि 26 एप्रिल रोजी पहाटे 5:30 वा. देहावसन झाले. दुपारी 3 वाजता आप्त, स्वकीय, नातेवाईक, मित्रपरिवार, यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलं मुली नातू पंतू असा मोठा परिवार आहे वैष्णव भक्त होते.
ते कीर्तनकार व प्रवचनकार होते पंचांग जाणते होते. त्यांनी साधु महाराज कंधारकर यांचे परम शिष्य म्हणून परिचित होते. वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ होते. त्यांच्या हयातीत मरवाळी या गांवी पोस्टमास्तर म्हणून पोस्ट ऑफिस योग्य रीतीने सांभाळले होते. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या