लोहा येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महामानवास अभिवादन !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
  लोहा येथील शासकीय विश्रामगृहात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा लोहा च्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधार चे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करून १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. लोहा कंधार चे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहात आमदार शिंदे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आले.
यावेळी पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हाउपाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे,लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, तालुकाउपाध्यक्ष संजय कहाळेकर,सरचिटणीस प्रदिप कुमार कांबळे, सचिव मारोती चव्हाण,सहसचिव तुकाराम दाढेल, कोषाध्यक्ष रमेश पाटील पवार, प्रसिद्धी प्रमुख शिवराज दाढेल यांच्या उपस्थितीत संपूर्ण अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्यावतीने अनेक वेळा सामाजिक उपक्रम हाती घेऊन राबविले जातात. महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी,सह असंख्य उपक्रम हाती घेत समाजासमोर नेहमीच एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे दिसून येते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या