भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून भद्रे परिवाराच्या वतीने नायगाव शहरात अन्नदान वाटप !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधत गेल्या चार वर्षापासून नायगाव शहरातील डॉ हेडगेवार चौकामध्ये सी.आर.पी.एफ. पंढरी शिवलिंग भद्रे बेटकबिलोलीकर व परिवाराच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात येत असून यावेळी नायगाव येथील डॉ हेडगेवार चौकामध्ये अन्नदानाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

तत्पूर्वी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन नायगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण. यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय अप्पा बेळगे, डी वाय एस पी किरण पोपळघट, पी आय मारकड साहेब, नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पा. चव्हाण, नगरसेवक पंकज पा. चव्हाण, नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, विजय भालेराव, नगरसेवक पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर, प्रभाकर लखपत्रेवार, अंकुश गायकवाड, प्रतिनिधी रवींद्र भालेराव, अशोक गायकवाड, चंद्रकांत आंबेवार, मंगेश हानवटे, बाबू झगडे, संजय भद्रे, रमेश भद्रे, राजू भद्रे, सिद्धार्थ गायकवाड, सचिन भद्रे, जयवंतराव वाघमारे, धम्मदीप भद्रे, मंगेश हनवटे सर, प्रमोद घंटेवाड, भीमराव हनमंते, सुनील पोटफोडे, भीमराव बेलके सर, साईनाथ नामवाडे, माधव डोनगांवे, विजय सोंडारे सोनजे, संजय भद्रे, शेषराव रोडे, राहुल इंगळे, लक्ष्मण गायकवाड, प्रकाश कुराडे, प्रकाश कागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या चार वर्षापासून भद्रे परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे.   आयोजक पंढरी शिवलिंग भद्रे, कांताताई पंढरी भद्रे, विशाल भद्रे, ऋतिक भद्रे यांनी केले असून शहरातील आंबेडकर प्रेमींनी अन्नदानाचा लाभ घेतला आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार प्रकाश हनमंते यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या