मौजे येसगी येथे भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्ताने पुतळ्यास अभिवादन.

पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन मा.पो.उप निरिक्षक जनार्धन बोधणे यांच्या हस्ते संपन्न !

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली तालुक्यातील मौजे येसगी येथे १४ एप्रिल रोजी भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्ताने तथागत गौतम बुध्द, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन सरपंच शेख सद्दाम, पो.उप निरिक्षक जनार्धन बोधणे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार टाकून विनंम्र अभिवादन करण्यात आले.

मौजे येसगी येथे पंचशील मित्र मंडळ च्या वतिने ज्ञानसुर्य महामानव भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून पोलीस उपनिरिक्षक जनार्धन बोधणे होते. जयती मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहाराने यथोचित सत्कार केला.

त्यावेळी येसगी गावचे सरपंच शेख सद्दाम चांद पटेल, बिलोली पो.स्टे चे उपनगरीक्षक श्रि.बोधणे, सगरोळी बिट जमादार श्रि.आंबेवार, जळकोटे, शिवराज भाऊ (सुर्यकार), भिम शक्तीचे कार्यकर्ते शिवराज प्रचंड, तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष प्रचंड, जयंती मंडळ अध्यक्ष त्रिपाल प्रचंड, मनोज सुर्यकर, महेन्द्र प्रचंड, पवन सुर्यकर, प्रेम प्रचंड, बालाजी प्रचंड, माजी उपसरपंच दिनेश प्रचंड, उपसरपंच मधुकर प्रचंड, प्रविण प्रचंड, रितेश प्रचंड विष्णूगुप्त प्रचंड, गौतम प्रचंड, मधुकर भालेराव आदी उपस्थित होते.

 जयती मंडळाच्या वतिने खिर, खिचडी वाटपाचा ही उपक्रम राबविला गेला. बौध्द उपासक, बौध्द उपासिका व चिमुकल्यांनी खिचडी, खिरचा आस्वाॕद घेतला.

या कार्यक्रमाचे सुञसंचलन कांबळे यांनी केले. सायंकाळी ४ वाजता महामानव भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचिञाचि भव्य मिरवणूक नाचत, जगाज गाजत काढून मोठ्या उत्साहात बौध्द बांधवांनी जयंती साजरी केली.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या