आंबेडकरवादी विद्यार्थी परिषद आयोजित क्रांती ज्ञान स्पर्धा परीक्षा उस्फूर्त प्रतिसाद.

[ गोविंद बिरकुरे ]
डॉ.सुनिलचंद्र सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या धर्माबाद येथील आंबेडकरवादी विद्यार्थी परिषदेने महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून दि:२७ मार्च २०२२ रोज रविवारी शिव फूले शाहू आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर आयोजित केलेल्या क्रांतीज्ञान या स्पर्धा परीक्षेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.

या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यां पैकी धर्माबाद,नांदेड येथून आलेल्या विद्यार्थ्यां बरोबरच ही परीक्षा देण्यासाठी खास हैद्राबाद येथून आलेले सेवानिवृत्त इंजिनिअर आयु. वाघमारे व पाचव्या वर्गातील दोन विद्यार्थी हे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सुमारे ( ४३ ) विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या परीक्षा उपक्रमाला आयु.गंगाधर धडेकर मा. ता.अध्यक्ष तथा विद्यमान सचिव (भा.बौ.महासभा धर्माबाद), प्रा. सचिन शिंदे, शशिकांत वाघमारे, सिध्दार्थ वाघमारे, बळीराम कांबळे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

परीक्षा यशस्वी करण्यासाठी परिषदेचे उपाध्यक्ष राहुल वारगडे सचिव पवन देवके, सहसचिव रवि चावरे, कोषाध्यक्ष अविनाश शिंदे सह कोषाध्यक्ष प्रज्ञान क्षीरसागर निमंत्रक सुधाकर जाधव प्रसिद्धी प्रमुख किरण हाणमंते यांच्या सह अजय आवधूते,आवनदास वाघमारे,विशाल कीलबिले, आदींनी परिश्रम घेतले आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी.शिव फूले शाहू आंबेडकरांच्या विचारांची जाणिव त्यांच्यात व्हावी या करिता डॉ.सुनिलचंद्र सोनकांबळे यांनी स्वंयदानातून सतत चालू ठेवलेल्या या बॅनर खालील परीक्षा उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या