जगत‌गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने २४ तास मोफत रुग्णवाहिका अंबुलन्सचा आज नरसीत लोकार्पण सोहळा !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   जगत‌्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने रामतीर्थ पोलिस ठाण्याअंतर्गत नरसी पोलीस चौकी येथे आज दि.१३ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य महामार्गावरील अपास्तग्रस्तांसाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका अंबुलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न होत असून या सोहळ्याला तालुक्यातील सर्वंच समाजबांधवांनी मोठ्या उपस्थित राहावे अशी विनंती नायगाव तालुका स्व- स्वरूप संप्रदाय सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

         अनंत श्री.विभुषित जगतगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने अध्यात्मिक कार्यक्रमा बरोबरच देहदान,वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त साहित्य,रक्तदान शिबीर असे अनेक समाज उपयोगी उपक्रम दर महिन्याला राबविण्यात येत असतात त्याअनुषंगाने राज्य महामार्गावरील वळन रस्त्यावर अनेक अपघात होऊन अपघातग्रस्ताना वेळेवर दवाखान्यात दाखल करण्यासाठी अंबुलन्स वेळेवर पोहोचतं नसल्याने अनेकांचे जीव गमवावे लागत आहे.
नांदेड – हैदराबाद व लातुर – निझामाबाद राज्य महामार्गावरील मुख्य चौक असलेल्या नायगाव तालुक्यातील नरसीफाटा येथे आज दि.१३ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य महामार्गावरील अपास्तग्रस्तांसाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका अंबुलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून परीसरातील सर्वंच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती नायगाव तालुका स्व – स्वरूप संप्रदाय सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या