102 रुग्ण वाहिका चालकास वेतन मिळेना – सात महिन्यापासून रुग्ण वाहिका चालकांवर उपासमारीची वेळ !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
नांदेड जिल्ह्यातील 102 रुग्ण वाहिका चालकांची भरती ही बाह्य यंत्रणेकडून कंत्राटी पद्धतीने करण्यात आली असून त्या संबंधित संस्थेच्या कंत्राकदाराने गेल्या सात महिन्यांपासून रुग्ण वाहिका चालताना वेतन न दिल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर त्या चालकावर उपासमारीची वेळ आली आहे,त्यामुळे तात्काळ कंत्राकदाराकडून वेतन मिळून देण्यात यावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात गेल्या अनेक वर्षापासून बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून आरोग्य विभागातील पदे भरली जात आहेत,त्याच अनुषंगाने 102 रुग्ण वाहिका चालकांची हि भरती करण्यात आली,पण संबंधित संस्थेच्या कंत्राकदाराकडून माहे मार्च ते सप्टेंबर 2022 पर्यंतचे वेतन रुग्ण वाहिका चालकांना अद्याप देण्यात आले नाही,त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर रुग्ण वाहिका चालकावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे संबंधित कंत्राकदाराकडून दिनांक 21 ऑक्टोंबर पर्यंत सर्व 102 रुग्णवाहिका चालकाच्या खात्यावर थकीत वेतन जमा करून द्यावे,अन्यथा दिनांक 22 ऑक्टोंबर पासून सर्व 102 रुग्ण वाहिका चालक आपआपल्या कार्यरत ठिकाणी काम बंद ठेवण्यात येणार आहे,त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदार व प्रशासनाची असेल अशा आशयाचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांना 102 रुग्ण वाहिका चालकांनी दिले आहे.

नांदेड जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माता, आरोग्य सेवक व सेविका,कनिष्ठ लिपिक, शिपाई आदींची भरती बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने करण्यात आली,त्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यास गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही,त्यामुळे दिवाळी सणाच्या समोर तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना संबंधित कंत्राकदाराकडून वेतन मिळवून देण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन लक्ष देऊन प्रयत्न करेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या