रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन ; दिनांक 24 मे रोजी कहाळा (खुर्द) येथे भव्य कार्यक्रम.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
तालुक्यातील कहाळा (खुर्द) येथील कै. ज्ञानेश्वर अनंतराव काशेटवार यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त काशेटवार परिवाराच्या वतीने एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य समाधान महाराज शर्मा केजकर यांचे दिनांक 24 मे रोज बुधवारी राञी भव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर काशेटवार यांचा अकरा वर्षांपूर्वी अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना लवकर रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णवाहिका मिळाली नसल्याने रस्त्यावरील अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांचे चिरंजीव गजानन काशेटवार यांनी रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना यापुढे रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध व्हावी. या दृष्टीकोनातून आपल्या वडिलांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त काशेटवार परिवाराच्या वतीने एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करून. याच कार्यक्रमात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास गुरुवर्य ह भ प नीळकंठ महाराज कहाळेकर, तपोमुर्ती देवपुरी महाराज यांच्यासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे पुढारी, कार्यकर्ते, आर्य वैश्य समाजातील पदाधिकारी, समाज बांधव, नातेवाईक, समस्त गावकरी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 24 मे रोज बुधवार सायंकाळी 7 ते 11 हा भव्य दिव्य कार्यक्रम कहाळा खुर्द येथील संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन काशेटवार परिवार व कहाळा खुर्द येथील समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या