जिवन संघर्ष रुग्णवाहिकेचे डाॅ.सचिन खल्लाळ साहेब यांच्या हास्ते लोकार्पण !
( धर्माबाद प्रतिनिधी – नारायण सोनटक्के )
धर्माबाद शहरातील तालुक्यातील गोरगरीब जनतेचा व रुग्णांचा फायदा व्हावा या उदार्हहेतून ना तोटा या तत्वावर चालवण्यासाठी जिवनसंघर्ष या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा डॉ.सचिन खल्लाळ यांच्या हस्ते फुलेनगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे पार पडला .
या कार्यक्रमास उदघाटक भुसंपादन नांदेड जिल्हाधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ, धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिंदे, सहय्यक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, अनिल सन्नगल्ले, वैद्यकीय अधिकारी वेणुगोपाल पंडित, उपविभागीय कार्यकारी अभियंता(mscb) सुमीत पांडे,धर्माबाद चे उद्योजक सुबोधजी काकाणी, माजी शिक्षक जि.बी.वाघमारे, पंचायत समितीचे सभापती मारोती कागेरू,मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जि.पी.मिसाळे,धर्माबाद पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील आलुरकर बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधव हणमंते बरेच मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी तथागत गौतम, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्या पुतळे ला अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आले.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले सर्व मान्य वरांचे आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित जनतेला संबोधित करताना नांदेड जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की शहरापासून दूर ग्रामीण भागातील जनतेला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल भगवान कांबळे परिवाराचे व मित्र मंडळी मी मनापासून धन्यवाद देतो. भगवान कांबळे हे पत्रकार असून जनसामान्यांच्या व विकासासाठी ते नेहमीच आग्रही असतात.मला त्यांचे कौतुक वाटते ही रुग्णवाहिका आवश्यक वेळी गरजूंना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेचे तुमचा आरोग्य चांगले राहावे व या रुग्णवाहिकेचा वापर कमीत कमी व्हावा अशा शुभेच्छा देतो.व लोकसहभागातुन लोकांनसाठी हॉस्पिटल उभारणी करवी.आशा शुभेच्छा देतो.उपस्थित सर्व मान्यवरांनी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमास शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक नगरसेवक माजी नगरसेवक अनेक मान्यवरांसह सर्व सभासद आणि स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवराज पा. गाडीवान यांनी केले.
आलेल्या पाहुण्यांचे व जनतेचे शाखेर मोखांडीकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या वेळी भगवान कांबळे मित्र मंडळी खुप मेहनत घेतली . रुग्णवाहिके संदर्भात सोशल मिडीयातुन अनेकांनी भगवान कांबळे यांचे अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.