आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था चा वतीने पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी जागा खरेदी करून केली स्वप्नपूर्ती !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून सर्व वारकरी परिवारातील सदस्याच्या सहा महिन्यांत पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी जागा खरेदी करून आपल्या स्वप्नपूर्तीचा दिवस उगवला आहे. आपल्या परिवारातील सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं भगवान पंढरी पांडुरंग परमात्माच्या सानिध्यात आपल्या परिवाराची हक्काची जागा व्हावी आणि त्या जागेवर आपली धर्मशाळा उभारण्यात यावी यासाठी आपण सर्वजण गेल्या सहा महिन्यापासून अहोरात्र परिश्रम घेत आहात. आपल्या निस्वार्थ सेवेच आपल्याला आज फळ प्राप्त झाले आहे .
आपण आपल्या परिवारासाठी केलेले कष्ट आज पूर्णत्वास जात आहेत. आपल्या सर्वांच्या मेहनतीचे जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आपल्या सर्वांना वाटत होतं लवकरात लवकर पंढरपूर येथे आपली जागा व्हावी. जागेची पाहणी करण्यासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी आपल्यातील पदाधिकारी मंडळींनी पंढरपूर येथे अनेक ठिकाणी जागा बघितली. अनेक जागा बघितल्यानंतर सर्वांच्या सोयीची जागा कोणती याबाबत दिनांक 21 मे 2024 रोजी आपण दत्तकृपा मंगल कार्यालय हडको येथे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये वारकऱ्यांना स्टेशनला उतरून धर्मशाळेत पायी जाता येईल. आणि धर्मशाळेतून मंदिराला सुद्धा पायी जाता येईल.. एवढ्या सोयीची जागा आपण पहावी असा सर्वानुमते ठराव पास झाला. आपण घेतलेली जागा पंढरपूर रेल्वे स्टेशन पासून अगदी एक किलोमीटर अंतरावर आहे आपल्या जागेपासून पांडुरंग परमात्म्याचे मंदिर पायी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे..
नगरपालिका क्षेत्रात जागा घेणे आपल्याला परवडण्यासारखे नव्हते परंतु म्हणतात ना आपला हेतू शुद्ध आणि सात्विक असेल तर देव कोण्या ना कोण्या रूपात येतो आणि सहकार्य करतो.या उक्तीप्रमाणेच आदरणीय श्री विठ्ठलभक्त श्री बोपेवार सर यांच्या संपर्कातून संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वंशजाचे जावई आदरणीय हभप राहुल महाडिक यांची भेट झाली आणि त्यांनी आपल्या परिवाराचं हे निस्वार्थी काम पाहून त्यांनी जागा खरेदीसाठी मदत केल्यामुळे पंढरपूर तिर्थक्षेत्र येथे जागा आपण घेऊ शकलो.
आपण सर्वांनी आपल्या वारकरी परिवाराला या यशोशिखरावर नेण्यासाठी आज पर्यंत खूप सहकार्य केले आहे. आपल्या सहकार्यासाठी उतराई होणे या जन्मी कदापि शक्य नाही. आपण दिलेल प्रेम, आपला जिव्हाळा अविस्मरणीय असाच आहे. धर्मशाळेची जागा घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून आपल्या परिवारातील स्त्री, पुरुष, लहान थोर सर्वांनी केलेले परिश्रम शब्दात सांगणे कठीण आहे. आजच्या क्षणी आपल्या चरणी फक्त आणखी एक विनंती करतो आज पर्यंत सहकार्य केलात तसेच सहकार्य आपल्या जागेसाठी लागणारी एकूण रक्कम व पारायण सांगता सोहळ्यासाठी लागणारा खर्च देणगीच्या माध्यमातून आपण सर्वांनी जमा करावा आणि पुढील वर्षी आषाढी, कार्तिकी वारीला आपल्या धर्मशाळेच्या जागेत विसावा घेता यावा यासाठी प्रयत्न करावेत. ज्यांच्याकडे देणगीसाठी बुक दिलेले आहेत त्या सदभक्ताने आपल्याकडील देणगी बुक हडको येथे ठरलेल्या बैठकीतील ठरावानुसार 1 जुलै 2024 पर्यंत ते देणगी बुक पूर्ण करून त्याची रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करावी. ज्यांचे देणगी बुक यापूर्वी पूर्ण झाले आहे त्यांनी त्यांच्या संपर्कातील इतर सदभक्ताकडे संपर्क करून त्यांच्याकडून प्राप्त झालेली देणगी आपल्या संपर्कातील आपल्या तालुक्यातील ज्यांच्याकडे देणगी बुक आहे त्यांच्या बुकावर देणगी जमा करावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आज आपण हे स्वप्न साकार करत आहोत. यामध्ये कोण्याही एकट्याचे श्रेय नसून ते सर्वांच्या निष्ठेचे आणि श्रद्धेचे फळ आहे.
             आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे धर्मशाळेची जागा घेण्यात आली. त्या जागेच्या व्यवहारासाठी संस्थापक अध्यक्ष हभप.राम महाराज पांगरेकर, दतराम पा एडके, व्यंकट महाराज जाधव माळकौठेकर, चंपत्तराव पा.डाकोरे, उत्तम बोपेवार गुरुजी प्रभाकर पा.पवळे, भगवान पा. राहटीकर, नामदेव पा. राहटीकर शिवाजी मदमवाड,सोपान पा.गिरे, सुरेश पा.इळेगावकर, बालाजी पा.पार्डीकर, सूर्यकांत पा. मारोती पा.माळकौठेकर, राजु पा., हरि पा., गजानन पा.मारोती पा.वानखेडे, सोहम महाराज रितेश पा जाधव बालाजी पा.जाधव इत्यादीनी परिश्रम घेतले.
 www.massmaharashtra.com