अमृत हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळेल – मा.आ.वसंतराव चव्हाण यांचा विश्वास !

आ. अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते अमृत हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर या प्रसंगी ते म्हणाले की, मला डॉक्टर होण्याची इच्छा होती पण होता आले नाही परंतु माझ्या मुलांना मी डॉक्टर बनविले आहे एवढा आनंद मला वाटतो भविष्यात रुग्णाच्या सेवेसाठी एक दवाखाना आपणही उभारणार आहोत त्या माध्यमातून रुग्णाची सेवा करण्याची संधी मिळेल. ही सेवा पवित्र आहे, असेही ते म्हणाले.
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव शहर हे महामार्गावर असल्यामुळे मुख्य सेंटर असल्याने ग्रामीण भागातील रुग्णासह मुखेड देगलूर बिलोली या तालुक्यातीलही रुग्णांना अमृत हॉस्पिटल मधील आय सी यु आणि क्रिटिकल केअर सेंटर च्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास मा.आमदार वसंतराव चव्हाण यांनी शुभारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

      नायगाव शहरात नव्यानेच अत्याधुनिक सेवेसह गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमृत हॉस्पिटल आय सी यु आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या भव्य शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा मा. आ. वसंतराव चव्हाण तर उद्घाटक म्हणून आमदार अमरभाऊ राजूरकर यासह नगराध्यक्ष मीनाताई सुरेश पाटील कल्याण, श्रीनिवास पाटील चव्हाण,मा.अ.से. जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, उपनगर अध्यक्ष विजय पाटील चव्हाण, माजी नगरसेवक देविदास पाटील बोंमनाळे काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय बेळगे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बालाजी मद्देवाड, डॉक्टर विश्वास चव्हाण यासह अदीजनाची प्रमुख उपस्थिती होती.
  मा.आ. चव्हाण आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना पुढे म्हणाले की, डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर यांची रुग्णासाठी सेवा अतिशय चांगली आहे, त्यांनी यापूर्वीही रुग्णाची सेवा केली कोरोना कोविडच्या काळात कोविड सेंटर उभारून डॉक्टर विश्वास चव्हाण यासह डॉक्टर दिग्रसकर आणि व त्यांच्या टीमने 140 रुग्णांना जीवदान दिले आहे म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो, असेही ते आवर्जून उल्लेख करीत पुढे म्हणाले नायगाव शहरात डॉ. शेख, डॉ वडजे, डॉ. शिंपाळे, डॉ. बसवंते, डॉ. गायकवाड यासह अनेक डॉक्टरांची रुग्णासाठी सेवा पारदर्शक आहे. बाहेर तालुक्यातून किंवा नायगाव तालुक्यातील रुग्ण नांदेड येथे उपचारादरम्यान जात असताना रस्त्यात काही रुग्णास गडबड झाली तर अमृत हॉस्पिटल मध्ये आय सी यु उपलब्ध असल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी मा.उपमहापौर आनंद चव्हाण, लक्ष्मण पाटील जिगळेकर, डॉ. डी.एस, शिंपाळे, अमृत हॉस्पिटलचे मुख्य डॉ. मधुसूदन पाटील दिग्रसकर, डॉ. किरण पाटील बिरादार, डॉ. निवृत्ती पाटील तेलंग , डॉ.प्राप्ती पाटील शिंदे, हनुमंत पारटवाड यासह अनेकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाची सूत्रसंचालन व आभार बालाजी शिंदे यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या