उद्याचा अमृत काळ नसून मरण काळ येणार आहे – प्रा. रामचंद्र भरांडे 

माझे जगणे ही मरणेही देशासाठी अशी प्रतिज्ञा घेऊन आयुष्यभर इंग्रजांविरुद्ध लढणारे थोर क्रांती पिता लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन उपस्थित समाज बांधवांनी केले.
[ नायगाव बा. ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
   अंग चोरून लढाई लढता येणार नाही कारण त्याचा पराभव होते म्हणून प्रस्थापित व्यवस्था समाजाला डायरेक्ट मारत नाही तर डायवेड करून मारत आहे, ज्यांचं वर्तमान नाही त्यांचं भवित्व नाही, तेव्हा समाजाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका लोकस्वराज्य आंदोलनाची असणार आहे असा खरमरीत सवाल प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आयोजित कार्यकर्ता बैठकीत उपस्थित केले.
   सामाजिक कार्यकर्ते डी के पवार यांनी आयोजित केलेल्या नायगाव शहरातील राजर्षी शाहू नगर येथे लोकस्वराज्य आंदोलन कार्यकर्ता बैठकीत अध्यक्षस्थानी कामगार आघाडी अध्यक्ष रावसाहेब पवार तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. रामचंद्र भरांडे आणि प्रा. डॉ.शंकर गड्डमवार यासह व्हि.जी डोईवाड , शेषराव रोडे, गणपत रेड्डी, नागोराव कमलाकर, डॉ. प्रभाकर गायकवाड, भीमराव बैलके, टी एम वाघमारे, रामदास कांबळे, चंद्रकांत वाघमारे, कामाजी वाघमारे, देविदास सूर्यवंशी, बाबुराव इंगळे, लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती डॉ .शंकर गड्डमवार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कालचा अर्थसंकल्प यापेक्षा दीडपट मंदिरातील देणगी आहे तेव्हा हे डोळसपणाने पहावे आणि दिवसेंदिवस अन्याय अत्याचार वाढत आहे म्हणून मजबूत संघटन महत्त्वाचे आहे तर प्रा. भरांडे म्हणाले की लढणाऱ्या माणसाचा इतिहास असतो तेव्हा पाचच माणसं क्रांतिकारी भूमिकेत असावे या व्यवस्थेत हाल होतात पण हार होत नाही असे सांगत महापुरुषाची त्यांनी उदाहरणे दिली. यावेळी अंकुश गायकवाड, संभाजी वाघमारे, प्रकाश ननुरे, प्रल्हाद भालेराव, मारुती घोरपडे, कोंडीबा गायकवाड, बापूराव देवकांबळे, पिराजी गायकवाड, पंढरी महाराज, गणपत पवार, शिवाजी गायकवाड, चांदु झुंजारे यासह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गंगाधर भंडारे यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या