‘मेरी माटी मेरा देश’अभियानांतर्गत कुंडलवाडीत अमृत कळस यात्रा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           येथील नगरपरिषदे अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समरोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमेअंतर्गत दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता शहरात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात आली, या यात्रेत शहरातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान शहरातून अमृत कळसा मध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कळस यात्रा काढण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे असल्यामुळे कुंडलवाडी नगरपरिषदे अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत असलेल्या दुसरा टप्प्यात शहरातील सर्व प्रभागात अमृत कळस यात्रा काढण्यात आली.

या यात्रेत प्रशासनाकडून नागरिकांच्या घरातील माती व तांदूळ संकलन करून त्यांना पंचप्रणतेची शपथ देण्यात आली,यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होऊन आपले योगदान दिले आहे. या यात्रे मध्ये शालेय विद्यार्थी व नागरिकांनी ‘जय जवान जय किसान’ ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ असे नारे देत देशाप्रती प्रेम व निष्ठा व्यक्त करत संपूर्ण शहर दणाणून सोडले आहे.

         यावेळी या कार्यक्रमाला प्रभारी मुख्याधिकारी आर जी चौहाण, साहयक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले, विश्वनाथ दाचावार, कार्यालयीन अधीक्षक सुभाष निरावार, मुंजाजी रेनगडे, प्रवीण शृंगारे, बालाजी टोपाजी, गंगाधर पत्की, प्रकाश भोरे,हेमचंद्र वाघमारे, शंकर जायेवार, जनार्दन भोरे, ओंकार सहाणे, मारोती करपे, मोहन कंपाळे, शुभम ढिल्लोड, धोंडीबा वाघमारे, भारत काळे, इनामदार इमरान, हरिदास रामदिनवार, शेख मजीद,शहरातील मिलिंद विद्यालय, के रामलू पब्लिक स्कुल,कै गंगाबाई सब्बनवार आदी शाळेतील विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या