नरसीत आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
 गणेश चतुर्थी ( गौरी गणपती ) निमित्त महाराष्ट्र सरकारकडून १०० रूपयात आनंदाचा शिधा देण्यात येत असुन बुधवारी सकाळी नरसी येथील बिबी फातेमा महिला मंडळ स्वस्त धान्य दुकानात भाजपाचे नेते श्रावण पा. भिलवंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना या शिधा किटचे वाटप सुरू करण्यात आले.
 सरकार कडून राज्यातील जनतेला दरमहा स्वस्त धान्य दिल्या जाते. गेल्या वर्ष भरापासुन वर्षातील काही सण, उत्सव व महापुरुषांच्या जयंती निमित्त सरकारकडून १०० रूपयात आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. गणेश चतुर्थी (गौरी गणपती) उत्सवानिमित्त सरकारकडून १ किलो चनादाळ, १ किलो साखर, १ खाद्यतेल पाॅकेट, १ किलो रवा देण्यात येत आहे.
नुकतेच नायगांव तहसील पुरवठा विभाकडून तालुक्यातील ३७ हजार कुटुंबाना आनंदाचा शिधा देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना या आनंदाचा शिधाची किट पोहचविण्यात आले आहे.
बुधवारी नरसीतील बिबी फातेमा महिला मंडळ यांच्या स्वस्त धान्य दुकानात भाजपाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे व सरपंच गजानन पाटील भिलवंंडे, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, ग्रामपंचायत सदस्य सय्यद ईस्माइलसाब यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा किट वाटप सुरू करण्यात आले. आणि गावातील माधव सुर्यवंशी व चेअरमन सेवा सहकारी सोसायटी यांच्या ही स्वस्त धान्य दुकानातून किट वाटपाला सुरुवात करण्यात आले आहे. 
  यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सय्यद खतिजाबी, सामाजिक कार्यकर्ते लालबा सूर्यवंशी, परेश सूर्यवंशी, माधव तळणे, जेष्ठ नागरिक मोहनमामा सुर्यवंशी, शेषेराव पाटील भिलवंडे, रमेश वासरे, संभाजी कंदुर्के, सय्यद रफीक बाबूसाब, मारोती जाधव, आनंदा सुर्यवंशी यांच्या सह महीला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या