आनंदाच्या शिधां चे नायगाव मध्ये वाटप सुरु !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
सर्व सामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने शंभर रुपयात साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल देण्याची घोषणा केल्यानंतर उशिरा का होईन नायगाव तालुक्यात सर्व साहित्य पोहचले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातून ‘आनंदाचा शिधां’चे वाटप सुरु करण्यात आले आहे. 
        नायगाव तालुक्यात एकूण ३९३१६ शिधपात्रिका धारक आहेत. त्यात अंतोदय योजनेचे कुटुंब ४३३२ प्राधान्य कुटुंब ३०१३१ केशरी शिधापत्रिका ४८५३ लाभार्थी आहेत. त्यात एका कुटुंबाला एक किलो दाळ,एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो पामतेल याचा समावेश असून. राज्य शासनाने घोषणा केलेले सर्व साहित्य नायगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारापर्यत पोहचले असल्याने ग्रामीण भागात त्याचे वाटप सुरु झाले आहे. 
      येथील सेवा सहकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुचकानातही आनंदाचा शिधा पोहचला असल्याने सोमवारी सकाळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किशनराव बोमनाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, प्रभाकर लखपत्रेवार, पंडीत वाघमारे, अंकूशकुमार देगावकर सोसायटीचे सचिव करखेले यांच्या उपस्थितीत ‘आनंदाचा शिधा’ वाटप सुरु करण्यात आले. 
     दिपावली सनाला प्रारंभ झाला तरी शासनाच्या घोषणे प्रमाणे धान्य वाटप होत नसल्याने नागरिकांत तिर्व संताप व्यक्त केला जात होता. जनमानसात वाढता रोष पहाता नायगाव तालुक्यात लक्ष्मी पुजंनाच्या दिवशी सोमवारी या धान्य किटचे वाटप व्हा.किसनराव बोमनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. शासनामार्फत वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिदा किट मध्ये उच्च दर्जाचे साहीत्य असल्याने नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या