पुरातन कालीन मनुर तब येथील महादेव मंदिरात यात्रेनिमित्ताने भावकांना पुरण पोळीचे जेवण

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील मनुर त ब गोदावरीच्या ताटावर असलेल्या पुरातन कालीन हेमाळपंथी महादेव मंदिराच्या अखंड हरिनाम दत्त सप्ताह व चातुर्मास सांगता सोहळा निमित्त हजारोंच्या संख्येने भाविकीनी दर्शन घेऊन पुरणपोळी चांगल्या तुपाची भंडाऱ्याचा जेवणाचा स्वाद घेतला.

नायगाव तालुक्यातील मनुर त ब येथे गोदावरी गंगेच्या तटावर पुरातन कालीन सातशे वर्षांपूर्वीचे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या शिखर शिंगणापूर प्रतिरूप समजले जाणाऱ्या महादेव मंदिर व बळीचे मंदिर एकत्र वास असलेल्या महादेव व बळी मंदिरात भाविकांच्या वतीने अभिषेक पूजा, आरती, प्रसाद, विविध कार्यक्रम होत असतात.

त्यानिमित्ताने दर्शनासाठी भाविकांची दररोज कधी होत असते परंतु नुकतेच मंदिराच्या वतीने अखंड दत्तनाम सप्ताह व चातुर्मास सांगता सोहळा निमित्ताने पोथी वाचन, अभिषेक पूजा, यज्ञ , किर्तन प्रवचन आरती प्रसाद सात दिवस गावातील भाविकांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सांगता दिनांक दहा डिसेंबर रोजी श्री 1008 श्री महंत प्रयागगीरजी महाराज मठ संस्थान दोलारा तालुका लोहा तसेच महादेव मंदिराचे पुजारी श्री संत महादेव गिरी महाराज मंदिर म्हणून यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी महापूजा महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादांमध्ये पुरणपोळी तुपाचे वरण-भात जेवण केले होते.
दर्शनाच्या वेळी आमदार राजेश पवार यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषद सदस्य पुनमताई पवार व उमरीचे उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, प्रल्हाद पाटील शिंदे, गुनाजी पाटील शिंदे गोविंदराव गुरुजी शिंदे, यांची उपस्थिती होती.
दर्शनानंतर हजारोंच्या संख्येने गावकऱ्यासह भाविकांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला गावातून मंदिराकडे येण्यासाठी आमदार राजेश पवार यांनी दोन कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर केले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले शासनाच्या वतीने पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र घोषित करून पूरातनकालीन महादेव बळी मंदिराच्या कायापालट करावा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातील भाविकास गावातील नागरिकांनी केली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या