बिलोली तालुक्यात अंगणवाडीच्या बालकांना निकृष्ट डाळीचा पुरवठा ; पुरवठा करणाऱ्या कंञाटदाराची सखोल चौकशी करण्याची मागणी 

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार योजने अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या डाळी वाटप करण्यात आल्या आहेत, या डाळी खाऊन मुलांचे पोषण होईल का असे पालका कडुन बोलले जात आहे.
तालुक्यातील अंगणवाडीत 0 ते 3 वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. हा आहार पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठेकेदारांची नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत राज्यभरात या पोषण आहाराचा पुरवठा होतो. पूरक पोषण आहार अंतर्गत मसूर डाळ, मूग डाळ, तेल, मीठ, मिरची, हळद, चना, गहू आणि तांदूळ आदी साहित्य वाटप केले जाते जुलै महिन्यात पुरवठादाराने अंगणवाड्याना दिलेली मसूर डाळ, मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आसल्याने ग्रामीण भागातील महीला मध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.
       सामाजिक कार्यकर्ते वैभव घाटे यांनी गंजगाव येथिल अंगणवाडीत जाऊन पोषण आहाराच्या धान्याची पाहाणी केली आसता यावेळी मसूर डाळ व मूग डाळीचे पाकिटे फोडून पाहाणी केली असता, मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले, तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण शून्य करण्यासाठी पोषण आहार योजना राबवली जाते. बालकांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळाला पाहिजे. अशा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी. संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी वैभव घाटे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे केली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या