म्हसळ्यात निपुण भारत अंतर्गत शिक्षक व अंगणवाडी सेविका यांची संयुक्त कार्यशाळा !

[ म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
भारत सरकारच्या निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करण्यासाठी म्हसळा तालुक्यात इयत्ता पहिली ते तिसरीला शिकवणारे सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल व जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा गटात कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल चे ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय श्री सागर तुपे साहेब तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी माननीय श्रीमती वैष्णवी कळबास्कर मॅडम व पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री संतोष दौड हे उपस्थित होते
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026 ते 27 पर्यंत मूलभूत भाषिक कौशल्य व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाहीअसे शासनाचे मत आहे त्यामुळे वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरित एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करून सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे हा या अभिनयाचा मुख्य उद्देश आहे.
याच मुख्य उद्देश मनात घेऊन म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी अंगणवाडी सेविका व पहिली ते तिसरीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली यामध्ये डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता माननीय श्री सागर तुपे सर यांनी निपुण भारत बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच दुर्गवाडी अंगणवाडीच्या सेविका श्रीमती कर्णिक मॅडम यांनी अंगणवाडीत काय शिकवले जाते याबाबत त्यांचे मत व्यक्त केले त्यानंतर आदरणीय गटशिक्षणाधिकारी साहेब यांनी सर्व अंगणवाडी सेविका व शिक्षक यांची विस्तृत कार्यशाळा घेतली. यामध्ये निपुण कशासाठी या घटकावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम उद्देश समजावून सांगून कोविड 19 महामारी यामुळे भारतातील किती विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला याबाबत माहिती देऊन भाषिक कौशल्य विकास यातील घटकांची मुद्देसूत माहिती सांगून विद्यार्थ्यांना वाचन व लेखन करण्यास कसे शिकवावे ,तसेच पायाभूत संख्या साक्षरता ,संख्याज्ञान व गणितीय कौशल्य याबाबत सखोल मार्गदर्शन उपस्थितीत शिक्षकाना केले.
तसेच शाळा भेटी दरम्यान ज्या शिक्षकांचे वर्ग उत्कृष्ट दिसून आले त्यांचे देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला
अखेरीस अंगणवाडीतील विद्यार्थी व इयत्ता पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्याने अंतिम टप्प्यात भाषेमध्ये समजपुर्वक वाचन करणे व गणितीय कौशल्यात गुणाकार क्रिया करणे अपेक्षित आहे सांगून दिनांक ३०नोव्हेंबर २०२२पर्यत आपला म्हसळा तालुका १००% प्रगत होईल असा संकल्प या कार्यशाळेत करण्यात आला .सदरच्या कार्यशाळेसाठी शिक्षक -१४१ व अंगणवाडी सेविका १०८ उपस्थित होते.
सदरच्या कार्यशाळेसाठी सर्व गटसाधन केंद्रातील सर्व विषयसाधनव्यक्ती उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री संदिप भोनकर विषयसाधनव्यक्ती यांनी केले व श्री नंदकुमार जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त कार्यशाळेची सांगता केली.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या