के .रामलू शाळेचा अंगत शिंदे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत के. रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडीच्या अंगत शिंदे याने कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावले आहे.
अंगत शंकर शिंदे हा 14 वर्षे वयोगटातून जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेत तालुक्यातून प्रथम येऊन जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्व द्वितीय क्रमांक पटकावले आहे. याबद्दल त्याचे व त्यांला मार्गदर्शन करणारे शिक्षक रमेश कासलोड, कृपेश पडकुटलावर यांचे शाळेचे संस्थापक श्री. सायरेडडी ठक्कूरवार ,संचालिका सौ.रमा ठक्कूरवार , सचिव यशवंत संगमवार मुख्याध्यापक मठवाले,पर्यवेक्षक कागळे व शाळेच्या सर्व शिक्षकवृदांनी कौतुक केले आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या