प्रसिद्ध सिनेअभिनेते अनिल मोरेंची “जन्मभूमीत प्रत्यक्ष स्वच्छ्ता दुताची भुमीका साकार” पत्रकार संघाकडून सत्कार !

(विशेष प्रतिनिधी-रियाज पठान)
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुक्याच्या वतिने तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कर्मयोगी अशा अनिल उर्फ एकनाथ सटवाजी पा.मोरे या कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाची माणसात देव पाहणा-या सर्वसामान्यांत मिसळणा-या व्यक्तीमत्वाची दखल घेऊन शासकीय विश्रामगृह लोहा येथे नुकताच भव्य सत्कार केला.
संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या शिकवणीचा कायम प्रभाव असणाऱ्या सत्कार्यात अखंड अग्रेसर असणारे उत्कृष्ट वाणी,चांगले कर्म, सर्वसामान्यांचे चाहते, कुशाग्र बुद्धीमत्ता, अद्वितीय नेतृत्वाचा परिस म्हणजेच लोहा तालुक्यातील भुमी पुत्राने उभ्या आयुष्यात कधीच वाढदिवस साजरा केला नाही.
वडिलोपार्जित देण ती म्हणजे गावातील सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून समाजाचे काही देणे लागते या भुमीकेत वावरणाऱ्या समाज घडवणा-या अद्वितीय अशा गाडगेबाबांचा खराटा हाती घेतला व गाव स्वच्छ केले.
अतिशय अभ्यासू अशा व्यक्तिमत्त्वाने कार्य करणाऱ्या चार धाम म्हणजेच राळेगणसिद्धी,हिवरेबाजार,पाटोदा,गौरीशेगांव दौरा आटोपून ग्रामविकासाचा जणू संदेश घेऊन सिनेअभिनेते,माजी सनदी अधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे तज्ञ सदस्य अनिल उर्फ एकनाथजी मोरे गावाच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगले. दुसऱ्याच दिवशी स्वतः जन्मभूमीत तर हातात झाडू घेऊन कामाला लागले.
रायवाडी येथील प्रसिद्ध अशा नंदिकेश्वराचा प्रथमत: अभिषेक करून गावातील सर्व प्रजेला कोराना सुखी ठेवा सद्य स्थितीत जागतिक पातळीवरील कोविड-19 कोरोना महामारीचे संकट पाहता स्वच्छतेचा संदेश देत यांनी आपला वाढदिवस जन्मभुमी रायवाडी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबवून करून वाढदिवस आगळावेगळा साजरा करण्यात आला.
सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायत बिनविरोध काढून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावून गावाची वेगळी ओळख निर्माण केली.अशा या महान व्यक्तीमत्वाने गावाच्या समृद्धी साठी अखंडपणे जीव ओतून काम करत असतात.
गावातील प्रत्येक गल्ली बोळ स्वच्छ करून स्मशान भूमीपर्यंत साफसफाई करून नवा आदर्श निर्माण केला.त्याना ग्रामस्वच्छता अभियानात रायवाडीचे सरपंच ,गोविंदराव विभूते , ग्रामसेवक मंगनाळे, श्रीराम पाटील,पोलीसपाटिल वैजनाथ पांचाळ , शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधव कौठेकर,ग्रामपंचाय सदस्य रामदास पाटील,रजाक पटेल शिवाजी पवार,यशवंत मोरे, समदाणी शेख,प्रहार संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष चांद भाई, रोजगार सेवक जिल्हा अध्यक्ष मलंग शेख विठ्ठल गोंड,नामदेव सूर्यवंशी,फैज शेख,व संपूर्ण गावकरी मंडळींनी ग्रामस्वच्छता अभियान राबवले.
यावेळी कोरोना चा प्रदुर्भाव वाढत असल्याने सेनीटायझर व मास्क वापरून गाव स्वच्छ करण्यात आले. प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, जेष्ठ पत्रकार साहेबराव पाटील, दै.सत्यप्रभाचे संजय कहाळेकर, पत्रकार मारोती चव्हाण,तुकाराम दाढेल, शिवराज दाढेल, रियाज पठाण सह युवा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील, बालाजी सोनटक्के आदींनी यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सहृदय सत्कार केला.

ताज्या बातम्या