अनिरुद्ध मद्रेवार यांचे आर्य वैश्य समाज बांधवांच्या वतीने स्वागत!
नायगाव तालुका प्रतिनिधी..
नायगांव शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी महेश मद्रेवार याचे चिरंजीव अनिरुद्ध मद्रेवार यांनी जे. ई. ई . मध्ये 700 पैकी 652 विशेष गुण घेऊन उतीर्ण व आय.आय .टी मध्ये प्रवेश पात्र झाल्याबद्दल नायगांव तालुक्यातील आर्यवैश्य समाजाच्या वतीने 21 ऑक्टोबर रोजी सायं 7 वाजाता गंदेवार प्लाझा येथे एका कार्यक्रमात अनिरुद्ध च्या यशाचे कौतुक करून त्याच्या पाठीवर शाबासकीच थाप देऊन अनिरुद्ध आणि त्यांच्या आजोबा आई वडिलांचा सत्कार करण्यात आला आहे.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन चौधरी हे होते तर प्रमुख विठ्ठल मद्रेवार, विनोद गंदेवार, नगरसेवक आतुल कवटीकवार, महेश मद्रेवार ,राम मद्रेवार, सूर्यकांत कवटीकवार, गणेश पाळेकर , सतिश लोकमणवार चंद्रकांत बच्चेवार, धनंजय कवटीकर ,पवन गादेवार, साईनाथ मेडेवार, शंकर सा कासटवार ,श्रीनिवास गडपल्लेवार , संगम गंदेवार, मनोज आरगुलवार , आशिष मामीडवार, कैलास कवटीकवार खिसे सर, गजानन कोंडावार, विश्वनाथ मेडेवार, आदीनी अनिरुद्ध चा सत्कार करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सुरेख संचलन पवन गादेवार यांनी केले आहे.