अनिस म्हसळा प्रधान सचिव पदी प्रा.गावीत तर कार्याध्यक्ष रुपेश गमरे !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा जि रायगड कार्यकारणीची निवड मिटिंग संपन्न झाली. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.विनयकुमार सोनवणे, अनिप.जिल्हा कार्यवाह प्रा.डॉ.संजय बेंद्रे यांच्या उपस्थितीत सन 2022 साठी म्हसळा शाखेचे कार्यकारणी निवड करण्यात आली.
सर्वप्रथम म्हसळा शाखेचे युवा कार्यकर्ते अशफाक तडवी यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. मागील कार्यकारिणीचा अहवाल प्रधान सचिव रुपेश गमरे यांनी मांडला व त्यानंतर 2022 साठीचे नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे सर्वानुमते व स्वेच्छेने निवडण्यात आली.
अध्यक्ष पदी पुन्हा एकदा सय्यद नवाज नजीर तर उपाध्यक्ष पदी उदयोजक सुशांत मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हूणन रुपेश गमरे यांना बढती तर प्रधान सचिव प्रा. गावीत या नवीन युवकांची निवड करण्यात आली. वै.जाणीव प्रकल्प कार्यवाह पदी प्रमोद भांजी, प्रशिक्षण विभाग कार्यवाह पदी प्रभाकर बोलें यांची निवड करण्यात आली.
युवा विभाग कार्यवाह मीनाक्षी जैन तर महिला विभाग कार्यवाह ऋतिका काकडे यांनी पदभार स्वीकारला. सांस्कृतिक विभाग कार्यवाह म्हणून जयसिंग बेटकर यांनी तर  विविध उपक्रम विभाग कार्यवाह : संभाजी शिंदे व सिद्धांत शिंदे यांची निवड करण्यात आली.
अ. नि. प. कार्यवाह म्हणून रोहिणी सोनवणे, सोशल मीडिया विभाग कार्यवाह पदी प्रा. अंगद कांबळे, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह पदी सुहेल नाजिरी तर जोडीदाराची विवेकी निवड कार्यवाह पदी चंद्रकांत पवार व निधी संकलन कार्यवाह प्रा. भोसले के. एस यांची निवड करण्यात आली.
कायदेशीर सल्लागार म्हणून पुन्हा एकदा ऍड.सुदर्शन प्र. गमरे यांची निवड करण्यात आली. कोरोना मुळे मागील वर्षी व्यापक प्रमाणात काम करता आले नाही पण या वर्षी ही कसर भरून काढू असा विश्वास नवीन कार्यकारणी ने व्यक्त केला. लवकरच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर भापट येथे घेण्याच आश्वासन बेटकर सर यांनी दिले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या