बिलोली येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने विविध ठिकाणी साजरी.

( बिलोली ता.प्र- सुनिल जेठे )
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दि.१ आॕगस्ट रोजी बिलोली शहरात विविध ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचिञाचे पूजन व ध्वजारोहन प्रतिष्ठित व्यक्ती व अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करुन जयंती साजरी करण्यात आली.

साठेनगर समाज मंदिर येथे  महामानव लोकशाहीर अणाभाऊ साठे यांच्या जयंतीस प्रमुख मान्यवर म्हणून पी.एस.आय रायपल्ले यांनी उपस्थित होऊन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन केले.

देशमुख नगर येथे लोकशाहीर अणाभाऊ साठे यांच्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी मोहनराव जाधव, जेष्ठ नागरीक पांडूरंग बैलके यांना प्रमुख स्थान देऊन अणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन व ध्वजारोहन करुन जयंती साजरी केली.
शालेय विद्यार्थ्यांनी अणाभाऊ साठे यांच्या बद्दल मनोगतातून कार्य सांगितले. अॕटो युनियन च्या वतीने नवा बसस्थानक येथे माजी नगराध्यक्ष मा. यादवराव तुडमे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच पुजन व ध्वजारोहन केले.
तहसिल कार्यालयासमोर पञकारांच्या वतीने व मिलिंद पवार मिञ मंडळाच्या वतीने अणा भाऊ साठे यांच्या जयंतीस मंगेश कदम यांना आमंञित करुन त्यांच्या हस्ते पुजा करुन अण्णा भाऊ साठेंना अभिवादन केले.
 सायंकाळी देशमुख नगर-इंदिरा नगर, साठे नगर या दोन नगरवासीयांनी लोक शाहीर अणा भाऊ साठे यांच्या तैलचिञाची भव्य मिरळणूक मोठ्या उत्साहाने काढली.
या जयंतीसाठी माजी नगर अध्यक्ष मा.भिमराव जेठे, माजी नगर अध्यक्ष मा.विजयकूमार कुंचनवार, भाजपा युवा तालुका अध्यक्ष इंद्रजित तुडमे, सेवानिवृत शिक्षक पि.डी.गायकवाड, सेवानिवृत शिक्षक माळगे, सामाजिक  कार्यकर्ते मुकिंदर कुडके, संदिप कटारे, शिवाजी गायकवाड, दिप इंडळे, धमानंद मदळे, संजय कदम, गणपतराव लंके, सह पञकार, राजेंद्र कांबळे, रत्नाकर जाधव, माधव एडके, सतिश बळवंतकर, मोहसीन खान, सुनिल कदम, संजय जाधव, धम्मपाल जाधव, मार्तड जेठे, सय्यद रियाज,गफूर कुरेशी,पंढरी गायकवाड, वलीओदीन फारुखी, सुनिल जेठे, आदी नागरीकांंची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या