नरसीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी 

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत, साहित्यिक कवी, प्रभोदनकार व समाज सुधारक, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नरसीत मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त नायगाव तालुक्यातील नरसी येथील जुने गावात आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहण राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे हे होते तर माजी समाज कल्याण सभापती प्रतिनिधी जयवंतराव गायकवाड, रामतिर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे, पोलीस पाटील ईब्राहीम बेग पटेल, नंदकिशोर टोकलवाड, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे, संदीप पाटील कवळे, सरपंच गजानन पाटील भिलवंडे, एन.डी.नरसीकर, मधूकर निलंगेकर, माधव कोरे,यांची प्रमुख उपस्थिती होती. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग व त्यांचे जीवनकार्य याविषयी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारोतराव सुर्यवंशी यांनी केले तर आभार लालबा सुर्यवंशी यांनी मानले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जळबा सुर्यवंशी, राजु सुर्यवंशी, मनोहर सुर्यवंशी, दिगांबर सुर्यवंशी, खाकीबा सुर्यवंशी, सदानंद सुर्यवंशी, चांदु मामा सुर्यवंशी, रमाकांत सुर्यवंशी सह पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे व पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या