अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न.

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्तदान करावे – पो.नि.भोसले
[ बिलोली प्र – सुनील जेठे ]
बिलोली तालुक्यात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वी जयंती निमित्ताने बिलोली पोलीस ठाणे येथे दि.२८ जुलै रोजी ११:३० शांतता कमिटीची बैठक आयोजित केली असता पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली आहे.
सदर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती बिलोली तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात उत्साहाने दि.१ ऑगस्ट रोजी अथवा अन्य तारखेला साजरी केली जाते. यावेळी तालुक्यात व शहरातजयंती साजरी करत असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडता कामानये,कायदा सुव्यवस्थेला गालबोट न लागू देता,कायदा सुव्यवस्थेचा काटेकोर पालन करत उत्साहाने आनंदाने साजरी करण्यासाठी
कोणकोणती खबरदारी घ्यायची आहे त्याबद्दल मार्गदर्शन बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना या शांतता कमिटीच्या बैठकीत केला.
या बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके जयंती निमित्त अ.सा.यांचे ग्रंथ वाटप करण्यात येणार आहे असे मनोगतातून म्हणाले तर शाहीर गौतम भालेराव,बडूर सरपंच प्र.जाधव मोहन,व पोलीस पाटील महिला देशमुख नागमणी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले.
जयंती मंडळातील पदाधिकारी व पोलीस पाटील यांना पोलीस प्रशासन मुक्त जयंती शांततेच्या वातावरणात साजरी झाली पाहिजे सखोल, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्तदान करावे असे मनोगतातून पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी म्हणाले.
यावेळी बिलोरी शहरातील कार्यकर्ते मकींदर कुडके,बडूर सरपंच प्र.मोहण जाधव, शाहीर गौतम भालेराव,पो.पा.प्रतिनीधी राम पा.पोखर्णि, चंद्रकांत कुडके, बालाजी कुडकेकर,पत्रकार मार्तंड जेठे,सुनिल जेठे,मेघमाळे,तालुका व शहरातील जयंती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पोलीस पाटील यांची मोठ्या संख्येने शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या